तेलंगणातील शेतकऱ्यांचा भात पिकाकडे ओढा कायम

केंद्र सरकारने तेलंगणातील भातपिकाची हमीभावाने खरेदी करायला नकार दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना भातपिकाऐवजी अन्य पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केलेले आहे.
Paddy Sowing
Paddy Sowing

तेलंगणा सरकारच्या प्रयत्नांनंतरही राज्यातील शेतकरी भातपिकालाचा (Paddy Crop) प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात सरासरी १२.५० लाख हेक्टरच्या तुलनेत चालू रब्बी हंगामात (Current rabi Season) शेतकऱ्यांनी १४.५० लाख हेक्टरवर भाताचे पीक घेतले आहे. गेल्या वर्षी विक्रमी २१ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी भाताचे पीक घेतले होते.  

केंद्र सरकारने तेलंगणातील भातपिकाची हमीभावाने (Paddy MSP) खरेदी करायला नकार दिलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना भातपिकाऐवजी अन्य पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केलेले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना भातपिकाऐवजी इतर पिकांच्या लागवडीकडे (Sowing Of Paddy) प्रवृत्त करण्यासाठी एक विशेष अभियान राबवण्यात आले. मात्र, तरीही तेलंगणातील शेतकरी भात पिकापासून इतर पिकांकडे वळण्यास तयार नसल्याचे चित्र समोर आले आहे.

२०२०२-२१ मधील रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने तांदूळ खरेदीची (Rice Procurement) मर्यादा ४० लाखांवरून ४६ लाख टनांपर्यंत वाढवली होती. मात्र, चालू रब्बीसाठी केंद्राने राज्यातून तांदूळ खरेदीला नकार दिल्यानंतर तेलंगणा सरकारने (Telangana Government) उन्हाळ हंगामासाठी इतर पर्यायी पिकांचा विचार करण्याचे आवाहन केले होते. भातपिकाऐवजी अन्य पिकांच्या लागवडीसाठी आवाहन करूनही या हंगामात राज्यातील भातपिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे.   देशात पुढील ३-४ वर्षे पुरेल इतका तांदळाचा साठा असल्याने केंद्राने तेलंगाणातून पारबॉईल्ड रब्बी तांदूळ खरेदी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विविध खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांना भेटून याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नही केले. हे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात राजकीय आघाडी उभारण्यासाठी पुढाकार घेत दबावतंत्र अवलंबले.

दरम्यान, भातपिकाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी तेलबिया आणि बागायती पिकांच्या पर्यायाचा विचार करावा, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. परिणामी तेलबियांखालील क्षेत्र १.५ लाख हेक्टरवरून २ लाख हेक्टरवर गेले आहे. याशिवाय कडधान्यांच्या क्षेत्रातही काही प्रमाणात वाढ झाली असून ते १.३० लाख हेक्टरवरून २ लाख हेक्टरवर गेले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com