Paddy
Paddy

भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल वाढला

गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ रब्बी हंगामातीलभाताचे क्षेत्रकमी करण्याचे आवाहन करत आहेत.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ रब्बी हंगामातील (Rabbi Season) भाताचे क्षेत्र (Area Of Paddy) कमी करण्याचे आवाहन करत आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये भात वगळता इतर पिके घेणे शक्य आहे, अशा क्षेत्रांमध्ये रब्बी हंगामातील भाताचे क्षेत्र कमी करण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञ (Agricultural expert) करत आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ हे आवाहन करत आहेत. 

रब्बीतील भाताचे क्षेत्र कमी करण्यासाठी तज्ज्ञांकडून प्रामुख्याने दोन कारणांचा हवाला देण्यात येत आहे. भाताच्या अतिरिक्त उत्पादनामुळे (Paddy Production) देशातील धान्य गोदामांमध्ये (Wearhouse) तांदळाचाच साठा (Paddy Storage) जास्त आहे. तर काही भात उत्पादक राज्यांमध्ये उच्च तापमानामुळे रब्बीमध्ये उत्पादित भाताचे उत्पादन कमी मिळते. 

२१ जानेवारीच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या ३०.२१ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा भाताचे लागवडीखालील क्षेत्र २१.८६ टक्क्यांनी घटले असून यंदा २३.६१ लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. पुढील १-२ आठवड्यांत क्षेत्र वाढण्याची शक्यता असली तरी, अन्नधान्याखालील एकूण क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात भात पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ४३ लाख हेक्टर इतके आहे. यंदा तेलंगाणामध्ये मोठ्या प्रमाणात भात क्षेत्र घटले आहे. खरीप हंगामाप्रमाणे रब्बीतही काही मोजक्याच राज्यात भाताचे पीक घेतले जाते.     

बिझनेस लाईन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, समुन्नत्तीच्या संशोधन प्रमुख प्रेरणा देसाई (Prerana Desai) म्हणाल्या की, कमी एकरी क्षेत्रावर विशेषतः आंध्र प्रदेश, (Andra Pradesh) छत्तीसगड आणि ओडिशा येथे रब्बीमध्ये भात उत्पादन १०-१५ टक्क्यांनी कमी राहण्याची अपेक्षा आहे, जेथे शेतकरी इतर फायदेशीर पिकांना प्राधान्य देतात.   केंद्र सरकारने चालू रब्बी हंगामात पॅराबॉईल तांदूळ (Perboiled Rice) खरेदीला असमर्थता दाखविली आहे. विशेषत: तेलंगाणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातपिकाची निवड करतात. मागील वर्षीच्या ९ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी २.८३ लाख हेक्टरवर भात लावणी केली आहे.  

राज्य सरकारने केलेल्या सिंचन सुधारणांमुळे तेलंगाणातील रब्बी भाताचे उत्पादन गेल्या ४-५ वर्षात तीन पटीने वाढून २२ लाख हेक्टरवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी विपनण हंगामात ९२ लाख टन खरेदी केल्यानंतर भारतीय अन्न महामंडळाने रब्बीतील पॅराबॉईल्ड तांदूळ खरेदीस असमर्थता दर्शवली आहे. "आम्हाला कच्च्या तांदळाच्या खरेदीला कोणतीही अडचण नसून समस्या फक्त पॅराबॉईल्ड तांदळाची आहे. आमच्याकडे ३-४ वर्षांसाठी पॅराबॉईल्ड तांदळाचा साठा आहे. त्यामुळे आम्ही आणखी खरेदी करू शकत नाही", असे एफसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

खरीपात भाताखालील क्षेत्रात किरकोळ घट नांदवलेल्या पश्चिम बंगालमध्ये रब्बी भाताची पेरणी चांगली झाली आहे. तुटवडा भरून काढण्यासाठी रब्बी पेरणीवर भर देण्यात आला आहे. तर तामिळनाडूमध्येही यंदा भाताचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. भात हे कर्नाटकातील नगण्य पीक आहे. कर्नाटकातील ०.१५ लाख हेक्टरपैकी ०.०७ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com