केंद्र सरकारकडून भातपिकाची हमीभावाने खरेदी      

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांकडून किमान हमीभावानुसार (MSP) धान्यखरेदी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ९४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे.
paddy procurement
paddy procurement

महाराष्ट्रासह देशभरातील भातपिकाच्या उत्पादकांसाठी हा खरीप हंगाम चांगला जात आहे. या शेतकऱ्यांच्या तांदळाची सरकारने योग्य प्रकारे खरेदी सुरु ठेवली आहे. या खरीप विपणन हंगामात केंद्र सरकारकडून भातपिकाची खरेदी (Paddy Procurement ) करण्यात येत आहे.

गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांकडून किमान हमीभावानुसार (MSP) धान्यखरेदी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ९४ लाख १५ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. किमान हमीभावानुसार भातपिकाची खरेदी (Paddy Procurement ) करत १ लाख ३६ हजार ३५० कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

हेही पहा- 

केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२०२१च्या खरीप विपणन हंगामात २० फेब्रुवारी २०२२पर्यंत शेतकऱ्यांकडून एकूण ६९५ लाख ६७ हजार मेट्रिक टन भातपिकाची खरेदी (Paddy Procurement ) करण्यात आली.

यात महाराष्ट्रासह गुजरात, जम्मू आणि काश्मीर ,झारखंड, पंजाब, आसाम,चंदीगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, बिहार, ओदिशा, पुददूचेरी, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

या राज्यांपैकी भातपिकाची हमीभावाने सर्वाधिक म्हणजेच १८ कोटी ६८ लाख ५५३२ मेट्रिक टन खरेदी करण्यात आली आहे. ९ लाख २४२९९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३६,६२३. ६४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पंजाबपाठोपाठ चंदीगडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात १८,०३३.९६ कोटी जमा केले आहेत. तर तेलंगणातील शेतकऱ्यांच्या खात्यात १३७६३ कोटी रुपये जमा केले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com