कीडनाशक तंत्रज्ञानासाठी धोरणात्मक बदलाची गरज

रासायनिक कीडनाशकांच्या परिणामकारकतेच्या तुलनेत अधिक सरस जैविक कीडनाशके आपल्याकडे उपलब्ध आहेत. गुणवत्तेच्या कसोटयांत ती रासायनिक कीडनाशकांपेक्षाही दर्जेदार आहेत. मात्र त्यांचा वापर केला जात नाही.
Pesticide
Pesticide

जैविक कीडनाशकांतील (Organic Pesticide) नव्या तंत्रज्ञान आयातीला संमती देण्याची गरज असून त्यासाठी नियमन क्षेत्रात अनुकूल सुधारणांची गरज असल्याचे प्रतिपादन एफएमसी इंडियाचे (FMC India) अध्यक्ष रवी अन्नवरपू यांनी केले आहे.

रासायनिक कीडनाशकांच्या (Chemical pesticide) परिणामकारकतेच्या तुलनेत अधिक सरस जैविक कीडनाशके आपल्याकडे उपलब्ध आहेत. गुणवत्तेच्या कसोटयांत ती रासायनिक कीडनाशकांपेक्षाही दर्जेदार आहेत. मात्र त्यांचा वापर केल्या जात नाही. केंद्रीय कीटकनाशक बोर्डाकडून आपण त्याच्या वापरासाठी अर्ज करू शकत नाही, कारण तसे प्रावधानच आपल्याकडे नाही.

सेंद्रिय शेतीला चालना मिळू शकेल, अशी कीडनाशकांच्या क्षेत्रातील जैविक उत्पादने उपलब्ध असूनही त्यांच्या वापरास संमती दिली जात नाही, ही आपली मोठी समस्या आहे. त्यामुळे सरकारने या क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाच्या आयातीला संमती द्यायला हवी, असे प्रतिपादन रवी यांनी हिंदू बिझनेस लाईनशी बोलताना केले आहे.

कृषी क्षेत्रातील संशोधन (Agriculture research) आणि विकास (Agri-development) क्षेत्रातील वातावरणाबाबत बोलताना रवी अन्नवरपू यांनी या क्षेत्रातील नियमन व्यवस्थेत सुधारणांची गरज व्यक्त केली आहे. कृषी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील नवे संशोधन प्रत्यक्षात वापरास येण्यासाठी मोठा कालावधी जातो. इतर देशांच्या तुलनेत भारतीय कृषी क्षेत्र अधिकच नियमनाखाली आहे.

एखादे कृषीविषयक संशोधन प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी आपल्याकडे ७ वर्षे लागतात. इतर देशांत ही प्रक्रिया १ ते २ वर्षांची आहे. त्यामुळे विशिष्ट अशा किडीचा प्रादुर्भाव रोखणारे उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडायला लागणारा वेळ ही आपल्याकडील मोठी अडचण आहे.

ही प्रक्रियाही सुलभ असायला हवी. केंद्रीय कीटकनाशक मंडळाने दिलेले प्रमाणपत्र देशभरात चालायला आहे. मात्र आपल्याकडे राज्याची स्वतंत्र परवाना यंत्रणा सक्रिय असते. यामुळे योग्य ते कीडनाशक शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास वेळ लागतो.

ड्रोनच्या माध्यमातून कीडनाशकांच्या फवारणीस प्रोत्साहन देण्याची तसेच ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्याची सरकारची कल्पना स्वागतार्ह असल्याचे सांगताना अन्नवरपू यांनी, त्यासाठी ड्रोन हाताळणीचे ज्ञान असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध असण्याची गरज व्यक्त केली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या मदतीने हे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

ड्रोनच्या माध्यमातून कीडनाशकांच्या फवारणीमुळे कीडनाशकांची बचत होईल का? या प्रश्नावर अन्नवरपू यांनी, ड्रोन वापरामुळे कीडनाशके योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच वापरण्यात येतील. त्यांचा अतिवापर थांबेल. याशिवाय बाजारातील बनावट कीडनाशकांच्या वापराला आणि फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल.

उत्पादनवाढीमुळे शेतकरी कीडनाशकांच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित कीडनाशके वापरू शकतील, त्यासाठी सरकारनेही नियमन प्रणालीत सकारात्मक बदल करण्याची गरज असल्याचे अन्नवरपू यांनी नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com