पीएम फंडातील केवळ एक तृतीयांश रक्कम खर्च !

पीएम केअर्स फंडमधीलनिधीत २०२०-२१ मध्ये एकूण १० हजार ९९० कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी ७ हजार १८३ कोटी रुपये स्वच्छेने केलेली मदत म्हणून जमा झाली आहे. या निधीतील ४९४ कोटी रुपये हे परदेशामधील लोकांनी दिलेले आहेत.
PM Cares RTI
PM Cares RTI

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पुढाकाराने संकलित करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडमधील (PM Cares Fund) एकूण रकमेपैकी केवळ एक तृतीयांश रक्कमच खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

कमांडर (निवृत्त) लोकेश बत्रा यांनी दाखल केलेल्या (RTI )अर्जाला दिलेल्या उत्तरात ही गोष्ट उघड झाली आहे.  या निधीत २०२०-२१ मध्ये एकूण १० हजार ९९० कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे.  यापैकी  ७ हजार १८३ कोटी रुपये स्वच्छेने केलेली मदत म्हणून जमा झाली आहे. या निधीतील ४९४ कोटी रुपये हे परदेशामधील लोकांनी दिलेले आहेत. 

याच कालावधीत या फंडातून ३ हजार ९७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. यापैकी १ हजार ३११ कोटी रुपये हे ५० हजार मेड इन इंडिया (Made in India)व्हेंटिलेटर्सवर खर्च करण्यात आले. तसेच एक हजार कोटी रुपये राज्यांना स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी देण्यात आले होते.  

व्हिडीओ पहा 

ऑक्सिजन प्लॅन्टसाठी २०१ कोटी ५८ लाख रुपये आणि कोरोना लसीकरणासंदर्भात काम करणा-या प्रयोगशाळांवर २० कोटी ४० लाख खर्च करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली. ५० कोटी रुपये हे मुजफ्फरापूर आणि पाटण्यामध्ये दोन ५०० बेड्सची कोविड सेंटर्स आणि १६ आरटी-पीसीआर चाचण्यांचे केंद्र उभारण्यासाठी खर्च केले.

२०१९-२० मध्ये पीएम केअर्स फंडमध्ये (PM Cares Fund) एकूण ३ हजार ७६ कोटी ६२ लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे फंड सुरू केल्यानंतर पाच दिवसांत जमा झाले. पीएम केअर्स फंडच्या (PM Cares Fund) वेबसाईटनुसार हा सर्व निधी व्यक्तींनी, संस्थांनी स्वेच्छेने दिलेल्या पैशांमधून उभारण्यात आला असून अर्थसंकल्पामधून यामध्ये कोणताही निधी देण्यात आलेला नाही, असे म्हटले.

या फंडावरून विरोधकांनी सरकारवर अनेकदा निशाणा साधला असून याचा हिशेब पारदर्शक नसल्याची टीका केली. मात्र सरकारने ही टीका फेटाळून लावली.

लसींसाठी १ हजार ३९२ कोटी खर्च कोरोनाच्या ६ कोटी ६० लाख लसींसाठी १ हजार ३९२ कोटी ८२ लाखांचा खर्च याच निधीतून करण्यात आल्याचे सरकारने म्हटले, तर या निधीपैकी १.०१ लाख रुपये बँक चार्ज म्हणून देण्यात आला. ३१ मार्च २०२१ रोजी या फंडाचे क्लोजिंग बॅलेन्स हे ७ हजार १३ कोटी ९९ लाख इतके होते. मागील वर्षापेक्षा हे दुप्पट आहे.

२०२०-२१ मध्ये हा निधी ३ हजार ७६ कोटी ६२ लाख इतके होते. २०२०-२१ मध्ये एकूण १० हजार ९९० कोटी १७ लाख रुपये या फंडात आले. यामध्ये निधीवरील व्याज आणि इतर गोष्टींचाही समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com