पंतप्रधान पीकविमा योजनेचे ७ व्या वर्षात पदार्पण

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेला (पीएमएफबीवाय) सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते योजनेची सुरूवात करण्यात आली होती.
Crop Insurance
Crop Insurance

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेला (पीएमएफबीवाय) (PM Crop Insurance Scheme) सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते योजनेची सुरूवात करण्यात आली होती. येत्या खरीप हंगाम २०२२ (Kharif Season 2022) पासून ही योजना ७ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.  

नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Disaster) शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान (Crop Damage) होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. अशावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial Support) देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. केंद्र सरकारच्या पथदर्शी योजनेअंतर्गत ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एक लाख सात हजार ५९ कोटींहून अधिकचे नुकसानाचे दावे निकाली काढण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. तसेच ३६ कोटीहून अधिक शेतकऱ्यांचा पीकविमा उतरविण्यात आला आहे.    

पीकविमा योजना (Crop Insurance) राज्य, जिल्हा स्तरावरील तक्रार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी तळागाळापर्यंत मांडण्याची सुविधा देते. सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत योजनेतील शेतकऱ्यांच्या ऐच्छिक सहभागासह २०२० मध्ये सुधारणा करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानाची पूर्वसुचना देणे गरजेचे आहे. पीकविमा अॅप (Crop Insurance App), सीएससी सेंटर, कृषी अधिकारी यांच्या मार्फत शेतकरी नुकसानाची पूर्वसुचना दाखल करू शकतात. त्यानंतर दाव्याचे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जना केले जातात.

देशातील जवळपास ८५ टक्के छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली आहे. सर्वात असुरक्षित शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देण्याचे काम ही योजना करते. या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व राज्यांमधील शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा पॉलिसी पोहोचवण्यासाठी ‘मेरी पॉलिसी- मेरे हाथ' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विमा पॉलिसीचे शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन वितरण करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. सर्व शेतक-यांना त्यांच्यासाठी असलेली धोरणे, जमिनीच्या नोंदी, दाव्याची प्रक्रिया आणि पीएमएफबीवाय अंतर्गत तक्रार निवारणासंदर्भात आवश्‍यक असणारी सर्व माहिती दिली जावी. तसेच शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com