pomegranate damage : नैसर्गिक आपत्तींनी डाळींबाच्या वैभवाला घरघर

जागतिक बाजारात भारतीय डाळींबाला मोठी मागणी आहे. वर्षातील नऊ ते दहा महिने डाळिंबाचापुरवठा करणारा एकमेव देश म्हणून आपली ओळख आहे.
pomogranate
pomogranate

पुणेः कमी पावसाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मागील कमी वर्षांपासून डाळींब शेतीने आधार दिला. डाळिंबाची जागतिक बाजारपेठ दरवर्षी सुमारे १४ टक्क्यांनी वाढत आहे. ही बाजारपेठ २०२६ पर्यंत २ हजार ३१४ कोटी डॉलरपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. तसेच भारतीय डाळींबाला (pomegranate) अन् त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या डाळींबाला मोठी मागणी आहे. मात्र असं असूनही राज्यातील डाळींब शेती अडतणीत आली आहे. जागतिक बाजारात भारतीय डाळींबाला मोठी मागणी आहे. वर्षातील नऊ ते दहा महिने डाळिंबाचा पुरवठा करणारा एकमेव देश म्हणून आपली ओळख आहे. आपल्या डाळींबासाठी आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांची दारे नेहमीच खुली असतात. असं असूनही मागील काही वर्षांपासून मोठा आकार आणि गुणवत्तेच्या फळांचं उत्पादन घटल (production decreased) आहे. बांगलादेश अन् नेपाळमध्ये मध्यम आकाराची फळे जातात. मात्र आशिया आणि मध्य पूर्वेतील देशांत मोठ्या आकाराच्या डाळिंबांना पसंती असते. परिणामी या देशांत निर्यात कमी (pomegranate export) होत आहे. आपला माल जागतिक बाजारात कमी  जायला लागला. याचा लाभ टर्की आणि इजिप्तला होतो आहे. महत्वाच्या युरोपमधील बाजारात या देशांच्या गुणवत्तापुर्ण डाळींबाशी आपल्याला स्पर्धा करावी लागत आहे. 

 मग आपला डाळींब जागतिक बाजारात जात नाही म्हटल्यावर इतर देश याचा फायदा होत आहे. भारताला आव्हान देणारा पहिला देश म्हणजे टर्की. जागतिक बाजारपेठेत टर्किचा डाळिंब ऑक्टोबर ते मार्च दरम्यान येतो. हिकाझ, वंडरफूल आणि कानेर या टर्किच्या महत्त्वाच्या जाती. हिकाझ जातीचं सर्वाधिक उत्पादन आणि मागणी असलेली व्हरायटी आहे. टर्किच्या डाळींबाची वैशिष्ट्ये 1. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान डाळींब बाजारात येतो 2. हिकाझ, वंडरफूल, कानेर महत्त्वाच्या जाती  3. हिकाझ वाणचं सर्वाधिक उत्पादन होतं आणि मागणी असते

दुसरा देश आहे ट्युनिशिया. येथील डाळिंब गुणवत्तेसाठी ओळखले जाते. गुणवत्ता, गोड चव आणि लहान बी यासाठी येथील डाळींब प्रसिद्ध आहे. येथे गाबसी जातीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. येथील डाळिंब जर्मनी आणि इटली तसेच युरोपियन देशांसह मध्य पूर्वेतील देशांतही निर्यात होते. गुणवत्तेमुळे येथील डाळिंब महाग असते. ट्युनिशियाच्या डाळींबाची वैशिष्ट्य 1.  येथील डाळिंबाची गुणवत्तेसाठी ओळख 2. गुणवत्ता, गोड चव, लहान बी यामुळं प्रसिद्ध 3. येथे गाबसी जातीचे सर्वाधिक उत्पादन होतं 4. जर्मनी, इटली तसच युरोपियन देशांसह मध्य पूर्वेतील देशांतही निर्यात होते

 पेरू देशातही गेल्या काही वर्षांत डाळीब लागवड आणि उत्पादन वाढत आहे. येथील डाळिंबानंही जागतिक बाजारपेठेत वेगळं स्थान निर्माण केले आहे. पेरुच्या डाळिंबाला युरोप, कॅनडा आणि आशियायी देशांत मोठी मागणी आहे. पेरूच्या डाळींबाची वैशिष्ट्ये 1. गेल्या काही वर्षांत लागवड वाढली  2. जागतिक बाजारपेठेत वेगळे स्थान निर्माण केले  3. डाळिंबाला युरोप, कॅनडा, आशियायी देशांत मागणी  

देशातल्या सव्वादोन लाख हेक्टरपैकी महाराष्ट्रातच तब्बल पावदोन लाख हेक्टर, म्हणजेच देशातील ७५ टक्के डाळींब क्षेत्र आहे. पण गेल्या काही वर्षांत सततचा पाऊस, अतिवृष्टी, कीड-रोग यामुळं डाळींब वैभवाला घरघर लागली आहे. प्रत्येक हंगाम पाऊस किंवा गारपिटीच्या तडाख्यात डाळींब सापडत आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे या फळांना निर्यातीसाठी मागणी नाही. यंदाचा मृग हंगाम सुरु होऊन जवळपास दीड महिना होतो आहे. अशातच डिसेंबरमध्ये झालेल्या पावसानं डाळिंबाला दणका दिला. अनेक भागांत जवळपास १६ ते १७ तास पाऊस झाल्यानं तेलकट डाग रोग अन् किडीचा प्रादुर्भाव वाढला. तसचं आताही अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच परिस्थिती उद्भवते की काय अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. म्हणजेच मृग बहरावरील संकट कायम आहे. या संकटांचा परिणाम डाळींबाच्या गुणवत्तेवर होतो आहे. महाराष्ट्रात डाळींब शेती अडचणीत आली असली तरी कर्नाटक, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू राज्यांत लागवड वाढत आहे. गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांत पिकाला पोषक वातावरण असल्याने चांगले उत्पादन मिळत आहे. त्यामुळे येथील डाळिंब देशातील मुख्य बाजारपेठेत विक्रीस आली आहेत.

युरोपीय बाजारपेठेत ५०० ग्रॅमच्या पुढचे डाळिंब निर्यात होते. राज्यातील शेतकऱ्यांना निर्यातीची संधी आहे. तसेच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना डाळिंबाशिवाय पर्याय नाही. पण नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणी वाढल्यात. प्रत्येक राज्यानं सॅटेलाइटच्या माध्यमातून फळपिकांच्या लागवड क्षेत्राची मोजणी करावी, म्हणजे लागवडीची निश्चित आकडेवारी मिळेल. त्यामुळे फळ प्रक्रिया केंद्र कुठे उभारता येईल, याचा अभ्यासही होईल.  - प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com