शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर आजार

पीपीआर रोग मॉरबिली नावाच्या विषाणुमुळे होतो. प्रादुर्भाव झालेल्या शेळी-मेंढीच्या नाकातील-डोळ्यातील स्राव, शेणाद्वारे, दूषित चारा-पाणी याद्वारे पीपीआरचे विषाणू इतरत्र पसरत असतो.
PPR Contagious Disease Of Sheep and Goat
PPR Contagious Disease Of Sheep and Goat

पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स. शेळ्या मेंढ्यामधील पीपीआर हा जीवाणूजन्य होणारा रोग असून तो अतिसंसर्गजन्य आहे.  पीपीआर भारतात सर्वप्रथम १९७७ मध्ये तमिळनाडू येथे आढळून आला. हा रोग मॉरबिली नावाच्या विषाणूमुळे होतो. पीपीआर आजार मेंढ्यापेक्षा शेळ्यांमध्ये आणि पाच ते आठ महिने वयोगटांच्या करडांमध्ये जास्त प्रमाणात होतो. लक्षणे-

  1. बाधित शेळ्या-मेंढ्यांना अचानक ताप आल्याने शेळ्या-मेंढ्या उदासीन, झापड आल्यासारख्या दिसतात.

  1. डोळे, नाकातून सुरुवातीला पातळ आणि नंतर जाड, पिवळसर स्राव बाहेर येतो.

  1. शेळ्या-मेंढ्या बाहेर लेंड्या बाहेर टाकत असताना रक्त बाहेर येते.

  1. श्वास घेताना, खोकताना त्रास होतो.

  1. अतितीव्र स्वरूपामध्ये शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यु संभावतो

औषधोपचार

  1. हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे प्रभावी औषधोपचार नाही, पण लक्षणाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि जिवाणूंचे अधिक संक्रमण टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैवके, वेदनाशामक इंजेक्‍शन तीन ते पाच दिवसांसाठी द्यावीत.

  1. तोंडातील जखमा खाण्याच्या सोड्याच्या २ टक्के द्रावणाने किंवा १ टक्के पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ धुवावी. आणि बोरोग्लिसरिन लावावे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  1. आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निरोगी शेळ्या-मेंढ्यांत लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. तीन महिने वयाची व त्यावरील वयाच्या सर्व निरोगी करडांना लसीकरण करावे.

  1. लसीकरणाच्या आठ- दहा दिवस अगोदर जंतनाशकाची मात्रा द्यावी. त्यामुळे शरीरातील आंतरपरजिवीचे निर्मूलन होऊन लसीकरण प्रभावी होते.

  1. लसीकरण शक्‍यतो कळपातील सर्व शेळ्या-मेंढ्यांना एकदाच करावे. प्रादुर्भाव झालेल्या भागापासून कळप दूर ठेवावा.

  1. पीपीआर आजाराने दगावलेली शेळी-मेंढी उघड्यावर न टाकता खोल खड्डा करून पुरावी आणि त्यावर चुना टाकावा आणि मगच माती टाकून खड्डा बंद करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com