दरवाढीच्या शक्यतेने शेतकऱ्यांकडून डिझेल खरेदी

राज्यात २० फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर २२ ते २८ दरम्यान डिझेलची एक लाख ८५ हजार ९०० किलोलिटर एवढी विक्री झाली होती. गेल्या वर्षी या काळातील तुलनेत एक लाख नऊ हजार ६०० किलोलिटर विक्री जास्त झाली आहे.
Purchase of diesel from farmers with the possibility of price hike
Purchase of diesel from farmers with the possibility of price hike

नवी दिल्ली ः उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर इंधनाचे दर वाढण्याच्या शक्यतेने वाहन चालकांप्रमाणे शेतकरीही डिझेल खरेदीसाठी पेट्रोल पंपांवर गर्दी करू लागले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार पंजाबमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करून साठवणूक करीत आहे. हे हि पहा : 

पेट्रोलियम कंपन्यांच्या आकडेवारीतून डिझेल विक्री वाढल्याचे दिसत आहे. पंजाबमध्ये निवडणूक झाल्याच्या एक आठवड्यानंतर डिझेलच्या विक्रीत उच्चांकी वाढ झाली. राज्यात २० फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर २२ ते २८ दरम्यान डिझेलची एक लाख ८५ हजार ९०० किलोलिटर एवढी विक्री झाली होती. गेल्या वर्षी या काळातील तुलनेत एक लाख नऊ हजार ६०० किलोलिटर विक्री जास्त झाली आहे. सध्या डिझेलची जेवढी विक्री होत आहे त्यातील ३० टक्के खरेदी शेतकरी करीत आहेत.

खरीप हंगामातील पिकांची लावणी लवकरच सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना डिझेलची मोठी गरज असते. जादा दराने खरेदी करण्यापेक्षा पैसे वाचविण्यासाठी शेतकरी आताच डिझेल विकत घेऊन साठवत आहे, असे एका शेतकऱ्याने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com