Rain water on rice crop For seed processing The use of the device increased | Agrowon

बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढला

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

वाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यासाठी बीजप्रक्रिया यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे यंत्राद्वारे बीजप्रक्रिया करण्याकडे कल वाढून परिणामी पिकांची उगवण निरोगी होण्यास मदत होत आहे. 

वाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यासाठी बीजप्रक्रिया यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे यंत्राद्वारे बीजप्रक्रिया करण्याकडे कल वाढून परिणामी पिकांची उगवण निरोगी होण्यास मदत होत आहे. 

जिल्ह्यामध्ये सन २०१९-२० च्या  खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या अवघे १.१० टक्के आणि रब्बी हंगामात ६.७३ टक्के बीजप्रक्रिया करण्यात आली होती. बीजप्रक्रियेबाबत कृषी विद्यापीठ, कृषी विभाग सतत प्रचार, प्रसिध्दी करीत आहे. तरीही बीजप्रक्रिया करण्याचे प्रमाण का वाढत नाही, याचा सखोल अभ्यास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केला. त्यांना प्रामुख्याने काही गोष्टीमुळे हे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

बीज प्रक्रियेसाठी लागणारे रासायनिक व जैविक औषध वेळेवर व पुरेशा प्रमाणात बाजारात उपलब्ध होत नाहीत. बीजप्रक्रिया करण्यासाठी यंत्र नसणे, पेरणीचा मर्यादित कालावधी, काही शेतकरी स्व:त बीजप्रक्रिया करताना हात भरतात, हाताला खाज येणे, डोके दुखणे आदी कारणामुळे बीजप्रक्रिया करण्यास टाळाटाळ करतात, असे दिसून आले. त्यामुळे उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन औषध पुरवठा व यंत्राव्दारे बीजप्रक्रिया करून देण्यासाठी ५९ बीजप्रक्रिया यंत्रे घेतली. 

उमेदच्या महिला बचत गटाच्या मदतीने बीजप्रक्रिया करून घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखला. त्याची गावनिहाय अमलंबजावणी खरीप व रब्बीमध्ये करण्यात आली. त्यामुळे बीजप्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढून खरिपात एकूण क्षेत्राच्या ३०.४५ टक्के व रब्बीमध्ये ५३ टक्के झाली. त्यामुळे खरिपात सोयाबीन उगवणीचे व रब्बीमध्ये हरभऱ्यावर मर रोगाच्या तक्रारी नगण्य आल्या. उत्पादनात वाढ झाली.

जिल्ह्यात बीजप्रक्रिया करण्याच्या प्रमाणात आणखी वाढ व्हावी, या दृष्टीने यंत्र कमी पडू लागली. त्यासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून २०२१-२२ मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, गटांना ३१० बीजप्रक्रिया यंत्राचा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यात ३५७ यंत्रांद्वारे बीजप्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे खरिपात उगवणीबाबत एकही तक्रार आली नाही. या पुढेही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, असेही तोटावार यांनी सांगितले. 

  बीजप्रक्रियेचे फायदे
पिकांची उगवण चांगली होते. सुरुवातीचे २० दिवस पीक कीड व रोगमुक्त राहून जोमदार वाढते. फवारणीवरील खर्च कमी होतो. खर्चात बचत होते. १० ते १५ टक्के उत्पादन वाढते. हरभरा पिकाला मर रोगापासून संरक्षण मिळते.


इतर बातम्या
‘पेनटाकळी’बाधित गावातील नागरिकांना...बुलडाणा ः जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या बॅक...
गावातील नागरी सुविधांची कामे...अमरावती : गावातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, वीज या...
रोजगार निर्मितीसाठी महिलांना देणार...अमरावती : सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी महिला...
नाशिक : द्राक्ष उत्पादकांचे संकट...नाशिक : जानेवारीच्या मध्यानंतर द्राक्ष काढणी...
जळगावात पारा नऊ अंश सेल्सिअस खाली जळगाव ः खानदेशात गेल्या सात ते आठ दिवसांपासून...
नागपूर : कापूस चोरीप्रकरणी पाच जणांना...नागपूर : शेतातील गोठ्यात ठेवलेल्या कापूस...
रायगड,कर्जत : भात संशोधन संस्थेत ...रायगड, कर्जत : सर्वसामान्य व्यक्तीच्या आहारात...
नाशिक : जिल्हा बँकेतर्फे जप्त केलेल्या...नाशिक : वाहन व ट्रॅक्टर घेण्यासाठी नाशिक जिल्हा...
लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली...लातूर : कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील रब्बीच्या...
परभणीत पीककर्जाचे ४३.४१ टक्के वाटपपरभणी ः यंदाच्या रब्बी हंगामात १५ जानेवारीपर्यंत...
जळगाव जिल्ह्यातील तीन हजार कार्डधारक ...जळगाव ः शहरासह जिल्ह्यातील सुमारे तीन हजार केशरी...
कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक...कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बी हंगामात बारापैकी पाच...
महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी ः मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या...
न्यायालयाची मुदत संपल्याने ‘श्री...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
सोलापूर जिल्ह्यात वार्षिक योजनेसाठी...सोलापूर ः जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत...
मुद्रा योजनेत ३५ हजार युवकांना १३३...वर्धा : होतकरू युवकांना कर्ज देऊन त्यांना...
‘महावितरण’च्या विरोधात संभाजी ब्रिगेड...परळी वैजनाथ, जि. बीड : संभाजी ब्रिगेडतर्फे...
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...