डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके, द्रवरूप युरियाचा वापर वाढवा - केंद्रीय कृषिमंत्री

राज्यांनी एनपीके आणि द्रवरूप युरियाचा वापर वाढवून डीएपी खतांवरील अवलंबन कमी करावे, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली आहे.
Narendra Singh Tomar
Narendra Singh Tomar

वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि द्रवरूप (liquid Urea) युरियाचा वापर वाढवून डीएपी खतांवरील (DAP Fertilizers) अवलंबन कमी करावे, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केली आहे. याशिवाय तोमर यांनी राज्यांना त्यांच्या खतांच्या आवश्यकतेबाबत पूर्वनियोजन करण्यास आणि केंद्र सरकारकडे  खतांचा अंदाज कळविण्यास सांगितले आहे. ज्यामुळे खत विभागाला वेळेवर पुरेसा खत साठा देता येईल. २०२१-२२ च्या उन्हाळी हंगामासाठी  कृषिसंबंधी राष्ट्रीय परिषदेला गुरूवारी (ता.२७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तोमर यांनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.  

आज कृषि भवन नई दिल्ली में आयोजित जायद / ग्रीष्मकालीन अभियान 2022 के लिए चौथे राष्ट्रीय कृषि सम्मेलन की अध्यक्षता की...https://t.co/6KVPdx0syQ pic.twitter.com/ick5EppOZ3

— Narendra Singh Tomar (@nstomar)

यावेळी तोमर म्हणाले की, उन्हाळी पिके (Summer Crop) केवळ अतिरिक्त उत्पन्नच देत नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी रब्बी आणि खरीप हंगामादरम्यान (Kharif Season) रोजगाराच्या संधीही निर्माण करून उत्पादनही वाढवतात. कडधान्ये, भरड धान्ये, पोषक तृणधान्ये आणि तेलबिया (Oil Seed) यांसारख्या उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी सरकारने विविध कार्यक्रमांद्वारे नवीन उपक्रम हाती घेतले आहेत.

उन्हाळी हंगामादरम्यान निम्म्याहून अधिक लागवड क्षेत्र कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्याखाली असले तरी सिंचनाच्या स्रोतांच्या मदतीने शेतकरी उन्हाळी हंगामात भात आणि भाजीपाला लावतात. भातासह उन्हाळी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र २०२१७-१८ मधील २९.७१ लाख हेक्टर वरून २.७ पटीने वाढून २०२०-२१ मध्ये ८०.४६ लाख हेक्टर झाल्याचे तोमर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - राज्यात थंडीची लाट पसरणार : हवामानशास्त्र विभागाचा इशारा मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करणे आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून उन्हाळी हंगामासाठी पीकनिहाय लक्ष्य निश्चित करणे हा या परिषदेचा उद्देश होता. पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामग्रीचा  पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मोठ्या प्रमाणात आयात करावी लागत असलेल्या तेलबिया आणि डाळींचे उत्पादन वाढवण्याला  सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com