दोन शहरांत शस्त्रसंधीचा रशियाचा दावा

रशियन प्रमाणवेळेनुसार साधारणपणे सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोकांना शहरामधून बाहेर पडता येईल. यासाठी रशियन सैन्याने ग्रीन कॉरिडॉर(Green Corridor) उपलब्ध करून दिला असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
दोन शहरांत शस्त्रसंधीचा रशियाचा दावा
दोन शहरांत शस्त्रसंधीचा रशियाचा दावा

……. किव्ह, मॉस्को ः भारताप्रमाणेच युरोपीय देशांकडून आलेला दबाव आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागणाऱ्या रशियाने आज मारियोपोल आणि व्होलनोवाखा या युक्रेनमधील दोन शहरांमध्ये शस्त्रसंधी जाहीर केली. रशियन माध्यमांनी हा दावा केला असला तरी युक्रेनने मात्र तो फेटाळून लावला आहे. अडकून पडलेल्या लोकांना रशियाचे सैनिक (Soldiers of Russia)बाहेर पडण्यास मज्जाव करत आहेत, असा आरोप युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला. ही शस्त्रसंधी पाच तासांसाठी होती. रशियन प्रमाणवेळेनुसार साधारणपणे सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोकांना शहरामधून बाहेर पडता येईल. यासाठी रशियन सैन्याने ग्रीन कॉरिडॉर(Green Corridor) उपलब्ध करून दिला असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाच्या सैन्याने चारीबाजूंनी मारियोपोलची नाकाबंदी केली असून या शहराचा विद्युत पुरवठा, अन्न, पाणी, उष्णतेची प्रणाली आणि वाहतूक देखील रोखण्यात आल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

हे हि पहा :  या शहराचे महापौर वादिम बोयचेन्को म्हणाले की, ‘‘ येथील लोकांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून या संघर्षावर तोडगा काढण्यात यावा. स्थानिकांना अन्न आणि औषधांची नितांत आवश्यकता आहे.’’ दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष आज दहाव्या दिवशी देखील सुरूच होता. तत्पूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये रशियाने युक्रेनमध्ये अडकून पडलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही तयार आहोत अशी ग्वाही दिली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com