रशियाने थांबवली खतांची निर्यात

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम जगातील इतर देशांच्या व्यापारावर झाल्याचे दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियातून होणारी खतांची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
Fertilizer Export
Fertilizer Export

रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा (Russia Ukrain War) परिणाम जगातील इतर देशांच्या व्यापारावर झाल्याचे दिसत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी रशियातून होणारी खतांची निर्यात (Export Of Fertilizer) थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाचे उद्योग मंत्री डेनिस मंटुरोव्ह यांनी गुरूवारी (ता. १०) ही माहिती दिली आहे . याबाबतचे वृत्त बिझनेस लाईनने दिले आहे.

हेही वाचा - अपेडाची शेतमाल निर्यात २३ टक्क्यांनी वाढून १९.७ अब्ज डॉलर्सवर पश्चिमी देशांनी निर्बंध घालण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी ही घोषणा केली आहे. जर पश्चिमी देशांकडून रशियाची कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असतील, तर जागतिक बाजारपेठेवर त्याचे नकारात्मक पडसाद उमटणे स्वाभाविक असल्याचे पुतीन यांनी सरकारी बैठकीदरम्यान म्हटले आहे.

रशियाने मित्र देशांशी खतांच्या निर्यातीचे करार (Agreement Of Fertilizer Export) केले आहेत आणि खाद्य बाजारातील किमती वाढू द्यायच्या नाहीत. मात्र प्रत्यक्षातील परिस्थिती बिकट होत असून खाद्य बाजारातील किमती वाढत चालल्या आहेत.  त्यामुळे अन्न महाग होईल, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाच्या व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने खतांची निर्यात तात्पुरती थांबवण्याची शिफारस केली आहे. या शिफारशीनुसार रशियाकडून खतांची निर्यात थांबविण्यात आली. रशिया- युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिमी देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. त्याचा फटका व्यवसायाला बसतो आहे. रशियासोबतच अन्य देशांवरही याचे परिणाम होत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय मालवाहतूक कंपन्यांनी या निर्बंधांचे पालन करण्यासाठी रशिया आणि जवळपासच्या परिसरातील वाहतूक बंद केली आहे. जोपर्यंत वाहतूकदार कंपन्या त्यांचे काम पूर्वीप्रमाणे सुरू करत नाहीत आणि रशियन खतांच्या पुर्ण निर्यातीची हमी देत नाही. तोपर्यंत आम्ही रशियन उत्पादकांना खतांची निर्यात तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती रशियन उदयोग मंत्रालयाने दिली आहे. रशिया दरवर्षी ५०० लाख टन खतांचे उत्पादन करतो. जे जागतिक उत्पादनाच्या १३ टक्के इतके आहे. रशिया पोटॅश, फॉस्फेट आणि नायट्रोजनयुक्त खतांचा प्रमुख निर्यातदार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com