रशिया, युक्रेन युध्द भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर

सध्या रशिया आणि युक्रेनमधील युध्दामुळे युरोपात १९४५ नंतर सर्वांत भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खाद्यतेल, मका, गहू, बार्ली आणि राईच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
Maize and Wheat production
Maize and Wheat production

पुणेः युक्रेन आणि रशियातील युध्दामुळे (Russia-Ukraine war) जागतिक शेतीमाल बाजारात मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. भारताच्या दृष्टीने विचार करता गहू आणि मक्याला मागणी वाढू शकते. सूर्यफूल तेलाची (Sunflower oil) उपलब्धता कमी झाल्यामुळे खाद्यतेलाचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनमधील दरवाढीला बळ मिळाले आहे. अमेरिकेसह युरोपने रशियावर निर्बंध कडक केल्यास पेट्रोल-डिझेलचे दर (Fuel rates) भडकण्याची चिन्हे आहेत.

युक्रेन जागतिक पातळीवर सुर्यफूल तेल उत्पादनात अग्रेसर आहे. तर रशियातही सूर्यफूल उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जगातील सर्वाधिक गहू उत्पादन (Wheat production) रशियात होते. रशिया गहू निर्यातीत आघाडीवर आहे. तसेच युक्रेनही गहू निर्यातीत पहिल्या पाच देशांमध्ये आहे. त्याच बरोबर मका निर्यात युक्रेन जागात चौथ्या क्रमांकावर आहे. रशियाही मका निर्यातीत मागे नाही.

रशिया आणि युक्रेन मिळून जगातील ६० टक्के सूर्यफूल तेलाचे (Sunflower oil) उत्पादन करतात. निर्यातीतही त्यांचा ८० टक्के वाटा आहे.  जगातील २९ टक्के गहू या दोन देशांत मिळून पिकवला जातो. तसेच हे देश एकत्रितपणे जगातील १९ टक्के मक्याचा पुरवठा करतात.   सध्या रशिया आणि युक्रेनमधील युध्दामुळे युरोपात १९४५ नंतर सर्वांत भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खाद्यतेल (Edible oil), मका (Maize) , गहू (wheat), बार्ली आणि राईच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. युक्रेन युरोपसह, चीन, आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांत मका निर्यात (Maize Export) करतो. सध्याच्या तणावामुळे युक्रेनमधील मका पुरवठा बाधित होऊ शकतो. सध्या, भारतात निर्यातयोग्य मका उपलब्ध आहे. युक्रेनमधील मक्याचे आशिया डिलिवरीचे दर 360 डॉलर प्रतिटनापर्यंत होते. त्या तुलनेत भारतीय मक्याचे दर आशियायी देशांसाठी तीस-चाळीस डॉलरने महाग आहेत. परंतु सध्याच्या स्थितीत मका निर्यात शक्य आहे. मागील दोन महिन्यांत साधारण दहा लाख टन मका भारताने निर्यात केला. तसेच अमेरिका आणि नाटोच्या सदस्य देशांनी रशियावर निर्बंध वाढविल्यास रशियातून होणाऱ्या मका, गहू, सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होईल.  त्यामुळे भारतातील मका आणि गव्हाला मागणी वाढू शकते. त्यामुळे दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.   कोरोनानंतर जगभरात तेलबिया (Oilseeds), अन्नधान्य, सोयातेल (Soya-oil), पामतेल (Palm oil), सूर्यफूल तेलाच्या (Sunflower oil) किंमती वाढत्या राहिल्या आहेत. आता युद्धामुळे अनेक पिकांच्या भावाने नवा विक्रम रचला आहे. ही परिस्थिती आणखी किती काळ चालेल आणि किती देश यात उतरतील यावर जागतिक बाजार अवलंबून आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

व्हिडीओ पाहा -

अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. अनेक देश निर्बंध लादण्याच्या तयारीत आहेत. मात्र रशिया इंधन निर्मितीत (Fuel production) सौदी अरेबियानंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रशियाच्या व्यापारावर निर्बंध आणणे युरोपलाही महागात पडू शकते. यापूर्वीही रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. परंतु त्यामध्ये तुलनात्मक विचार करता अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांचेच जास्त नुकसान झाले होते, असे जाणकारांनी सांगितले. रशिया आणि युक्रेनचा जागतिक व्यापारातील वाटा गहू: 29 टक्के मका:19 टक्के सूर्यफूल तेल: 80 टक्के देशनिहाय सूर्यफूल आयात (टनांत) युक्रेन: 14 लाख रशिया: 2.2 लाख अर्जेंटिना: 2.2 लाख युक्रेनला होणारा व्यापार (२०२०-२१) शेतीमाल…निर्यात (टनांत) भुईमूग…१०,८०० नॉन बासमती...२७,६०० प्रक्रियायुक्त फळे...४,८०० बासमती…४,५०० (स्त्रोतः अपेडा)   रशियाला होणारा व्यापार माल...निर्यात (टनांत) नॉन बासमती…१,४०,००० ताजी द्राक्षे…२४,४००० ग्वॉरगम…२४,६०० म्हशीचे मांस…८,२०० प्रक्रियायुक्त भाज्या…१८,५०० (स्त्रोतः अपेडा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com