GM Soybean : ‘जीएम’चा मार्ग करा मोकळा

कापूस असो, सोयाबीन असो की वांगे आपल्या येथे त्यांच्या जनुकीय संशोधनाला परवानगी द्यायची नाही आणि यांचेच बियाणे बाहेरून अनधिकृतपणे येत असेल तर ते खुशाल येऊ द्यायचे, हे योग्य नाही.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

देशात बीटी कापसाच्या लागवडीला (BT Cotton Cultivation) परवानगी आहे, परंतु एचटीबीटीला (HTBT Cotton Cultivation) परवानगी नाही. असे असताना अनधिकृत एचटीबीटी बियाणे (Illegal HTBT Seed) देशात पाच-सहा वर्षांपूर्वीच दाखल झाले असून आज या कापसाने (Cotton Cultivation) देशातील २० ते २५ टक्के क्षेत्र व्यापले आहे. दरवर्षी कापूस लागवडीच्या हंगामात शासन-प्रशासन पातळीवर याला प्रतिबंध घालण्याच्या गप्पा होतात. काही ठिकाणी धाडी टाकून बियाणे जप्त केल्याचे नाटक केले जाते. परंतु दरवर्षी देशात एचटीबीटीचे क्षेत्र वाढत आहे, हे सत्य नाकारता येत नाही.

Soybean Rate
GM Soybean : देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनची मोठी खेप दाखल
Soybean Rate
GM Rice-भारतात जीएम भात नाहीः कृषिमंत्री तोमर

आता यापुढील बाब म्हणजे कोणत्याही खाद्य पिकांमध्ये देशात जीएमला परवानगी नाही. असे असताना जीएम सोयाबीनची एक मोठी खेप (जवळपास १८ हजार टन) देशातील मुंबई बंदरात दाखल झाली असल्याचा आरोप ‘सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने केला आहे. एक अनधिकृत काम करण्यासाठी त्या प्रक्रियेतील अनेक कामे अनधिकृतपणेच करावी लागतात. यातही मूळ दस्तऐवजात फेरफार, दुसऱ्याच देशातून हे आयात होत असल्याचे, शिवाय ते नॉन जीएम असल्याचे दाखविण्यात येत आहे, हे सर्व प्रकार गंभीर आहेत.

Soybean Rate
GM Soybean : जीएम सोयाबीन, मक्याला परवानगी द्या

देशात दाखल झालेले सोयाबीन जीएम असेल आणि त्याचा बियाणे म्हणून वापर झाला तर या देशातील शेतकरी तसेच संशोधकांवर तो मोठा अन्याय होईल. आपल्या येथील सोयाबीनच्या जाती ह्या कालावधी, वाढीची पद्धत, रोग-किडी आणि उत्पादन आदी अनेक बाबतीत बाहेरील (जीएम, नॉन जीएम) सोयाबीन जातींपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे आपल्या मूळ सोयाबीन जातींचे अस्तित्व यामुळे धोक्यात येऊ शकते.

अशा प्रकारच्या बियाण्याच्या प्रसारामधून नवीन कीड-रोग तसेच नव्या घातक तणांचा शिरकाव देशात होऊ शकतो. कापूस असो, सोयाबीन असो की वांगे आपल्या येथे त्यांच्या जनुकीय संशोधनाला परवानगी द्यायची नाही आणि यांचेच बियाणे बाहेरून अनधिकृतपणे येत असेल तर ते खुशाल येऊ द्यायचे, हे योग्य नाही. अशा प्रकारच्या आपल्या नीतीचा बाहेरील कंपन्या फायदा घेत आहेत. याद्वारे चुकीच्या पद्धतीने देशात घुसायचा एक वेगळा पायंडा त्या पाडत आहेत. त्यामुळे देशात शंकास्पदरित्या दाखल झालेल्या सोयाबीनचे नमुने घेऊन त्याची कसून तपासणी झाली पाहिजेत.

पीक कोणतेही असो जगभर आता जीएम बियाण्यांचाच वापर वाढला आहे. आपण मोठ्या प्रमाणात आयात करीत असलेल्या खाद्यतेलामध्ये बरेचसे तेल हे जीएम तेलबियांपासून बनविलेले आहे. ते आयात करून आपण खातो. शिवाय आपण आयात करीत असलेले अनेक ‘रेडी टू इट’ प्रक्रियायुक्त पदार्थांत जीएमचा वापर होतोय. देशात तयार होत असलेले सरकीचे तेल हे जीएमच आहे. या तेलाचा वापर लोणच्यापासून ते इतरही प्रक्रियायुक्त पदार्थ करताना होतो. जीएम सरकी पेंड मागील अनेक वर्षांपासून जनावरे खात आहेत. एवढेच नाहीतर जीएम बियाणे अधिक उत्पादनक्षम तसेच अनेक रोग-किडींना प्रतिकारक्षम असतात.

प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता जीएम वाणांत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उतरविता येते. त्यामुळे हवामान बदलाच्या काळात जीएम वाणांना पर्याय नाही. अशावेळी आपण विविध पिकांमध्ये जीएम वाणांचे संशोधन आणि वापराला प्रतिबंध घालून जागतिक स्पर्धेत मागे पडत आहोत. खरे तर आता खाद्यान्नामध्ये पण जीएम वापराला परवानगी मिळायला पाहिजेत. तशी मागणी शेतकरी, त्यांच्या संघटना आणि शेतीचे जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे सर्व पिकांमध्ये जीएम संशोधनाचा मार्ग देशात मोकळा झाला पाहिजेत. यावर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा. करण्याची वेळ आली आहे. याद्वारे तंत्रज्ञान वापराचे स्वातंत्र्य देशातील शेतकऱ्यांना मिळेल आणि जीएम शेतीमाल लपून-चोरून आणण्याची वेळ व्यापाऱ्यांवर येणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com