Pollution : कोंडलेला ‘श्‍वास’

पीएम - २.५ चा संबंध हवेतील सूक्ष्म कणांशी असून, त्याचे प्रमाणापेक्षा अधिक कण वातावरणात असतील तर ते मानवी आरोग्यास धोकादायक ठरतात.
Air Pollution
Air PollutionAgrowon

भारतातील ९९ टक्के लोकसंख्या प्रदूषित वातावरणात (Polluted Atmosphere) राहत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘ग्रीन पीस इंडिया’च्या (Green Peace India Report) अहवालातून पुढे आले आहे. जगभरातच माती-पाणी-हवा प्रदूषणाचे (Soil, Water, Air Pollution) प्रमाण वाढले असून, त्याचे प्राणघातक परिणाम समोर येत आहेत. सर्वच नैसर्गिक स्रोतांच्या प्रदूषणात (Pollution In Natural Source) भारत देश सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) निश्‍चित केलेल्या श्‍वसनायोग्य पातळीपेक्षा खूपच अधिक प्रदूषित हवेत आपण राहत आहोत. या मार्गदर्शक सूचनेत श्‍वसनायोग्य हवेतील पीएम - २.५ (पार्टिक्युलेट मॅटर) कणांचे प्रमाण दिले असून, त्यापेक्षा पाचपट अधिक कण असलेल्या प्रदूषित हवेत भारतीय लोकांचा श्‍वास कोंडत आहे.

Air Pollution
Water Pollution: जलप्रदूषणामुळे पंजाबला शंभर कोटींचा दंड

पीएम - २.५ चा संबंध हवेतील सूक्ष्म कणांशी असून, त्याचे प्रमाणापेक्षा अधिक कण वातावरणात असतील तर ते मानवी आरोग्यास धोकादायक ठरतात. २०१९ मध्ये सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे भारतात २३.५ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला होता. हवा प्रदूषणामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या यांत ७१ टक्के (१६.७ लाख) होती. त्यातही हवेतील पीएम - २.५ किंवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या प्रदूषित कणांमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ९.८ लाख होती, तर घरातील हवा प्रदूषणामुळे ६.१ लाख जणांचा मृत्यू झाला होता. यावरून हवा प्रदूषणाची गंभीरता आपल्या लक्षात यायला हवी.

Air Pollution
Pollution : भारतीयांचा श्‍वास प्रदूषित वातावरणात गुदमरला!

जगभरात २०१९ मध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमुळे ४६ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले. ते जागतिक आर्थिक उत्पादनाच्या ६.२ टक्के होते. उत्तर भारतात हवा प्रदूषणाची तीव्रता सर्वाधिक आहे. भौगोलिक रचना व ऊर्जा, उद्योग, कृषी व इतर उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. भारतात घरामधील जीवाश्म इंधनाचे ज्वलन हे देशातील हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण आहे. त्यानंतर, कोळशाचे ज्वलन आणि पिके जाळण्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा क्रमांक लागतो. भारतात अलीकडे हवा प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे.

सध्या भारतातील ९९ टक्के लोकसंख्या प्रदूषित वातावरणात राहत असली तरी ५६ टक्के लोकसंख्या आणि ६२ टक्के गर्भवती महिला सर्वाधिक प्रदूषित भागात राहतात. हवा प्रदूषणामुळे फुप्फुसासंबंधी आजार उद्‍भवतात. तसेच फुप्फुसाच्या रोगप्रतिकार क्षमतेवर आघात होतो. त्यामुळे श्‍वसनाच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. या सर्व बाबी गांभीर्याने घेऊन देशात हवा प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून ते शासन-प्रशासन अशा सर्वांनीच प्रयत्न वाढवायला पाहिजे.

भारतात हवा प्रदूषण कमी करण्यासाठी २०१९ मध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२४ पर्यंत हवेतील पीएम - २.५ चे प्रमाण २०१७ च्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे ठरविले होते. केंद्र पातळीवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तर राज्य पातळीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळे फार पूर्वीपासून आहेत. असे असले तरी केंद्र आणि राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांत समन्वय दिसून येत नाही. शिवाय हवा प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी देशात सक्षम सशक्त केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा देखील नाही. जीवाश्म इंधन, कोळसा आणि पीक काढणीनंतरचे अवशेष यांचे ज्वलन कमी करून हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी करता येते.

या इंधनाला पर्यायी इंधन स्रोत आता निर्माण होत आहेत. त्याचा वापर झाला पाहिजेत. देशात इथेनॉल, सीएनजी इलेक्ट्रिक व्हेइकलचा वापर वाढला पाहिजेत. मोठ्या तसेच लहान उद्योगधंद्यांसाठी नियमावली बनवून शिवाय त्याचे त्यांच्याकडून काटेकोर पालन करून घेऊन हवा प्रदूषण कमी करता येते. त्याचप्रमाणे घरातील प्रदूषण छोटेखानी असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ग्रामीण भागतही चुलीऐवजी गॅसचा वापर वाढला पाहिजे. चुलीचा वापर अनिवार्य असलेल्या ठिकाणी त्या निर्धूर चुली असायला हव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com