Green Energy : हरित ऊर्जा स्थानके साखर कारखान्यांसाठी फायदेशीर

हरित ऊर्जा स्थानकांद्वारे केवळ ग्रीन हायड्रोजनच नाही तर संपूर्ण बायो-बास्केट, अर्थात बायो-फ्यूएल, बायो-फर्टिलायझर्स आणि ग्रीन हायड्रोजन यांच्या वितरणाची सोय साखर कारखान्यांना उपलब्ध होईल.
Green Energy
Green EnergyAgrowon

Green Energy Business Meet : साखर उद्योगाचे (Sugar Industry) प्रतिनिधी व हरित ऊर्जा (Green Energy) क्षेत्रातील तंत्रज्ञांची ‘ग्रीन एनर्जी बिझनेस मिट’ पुण्यात नुकतीच यशस्वीपणे पार पडली. साखर उद्योग आता साखर निर्मितीशिवाय (Sugar Production) हरित ऊर्जा क्षेत्राकडे वाटचाल करणार आहे.

इथेनॉल उत्पादनवाढीबरोबर (Ethanol Production) २०३० पर्यंत देशभरात ‘आयएसईसी’च्या (इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन) माध्यमातून ५०० नवी हरित ऊर्जा स्थानके (ग्रीन एनर्जी स्टेशन्स) उभारण्याचा निर्णय या वेळी झाला आहे.

जागतिक तापमानवाढीने सर्व जग होरपळून चालले आहे. वेगवेगळे देश, संस्था, शास्त्रज्ञ या समस्येचा सामना करा करायचा, यासाठी प्रयत्नशील आहेत.

जीवाश्म इंधनाच्या (पेट्रोल, डिझेल) ज्वलनाने प्रदूषण वाढत असून, त्यामुळे तापमानवाढीचे चटके जगाला बसताहेत. त्यात जागतिक पातळीवरची प्रगती म्हणजे हायड्रोजनचा उपयोग हा केवळ इंधनासाठीच नाही तर ज्या उद्योगासाठी वीज लागते, तेथेही केला जात आहे.

अर्थात, ‘ग्रीन हायड्रोजन’कडे भविष्यातील शाश्‍वत इंधन म्हणून संपूर्ण जग पाहतोय. भारत सरकारने यापूर्वीच ‘ग्रीन हायड्रोजन मिशन’ची स्थापना केली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात हरित ऊर्जेकरिता १९,७०० कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.

Green Energy
Green Energy : पर्यावरण पूरक हरित ऊर्जा

येत्या काही वर्षांत देशातील सर्वच उद्योगात किमान १५ टक्के ऊर्जा वापर हा ग्रीन हायड्रोजनचा करावा, असे बंधन घालण्याच्या विचारात सरकार आहे. अर्थात, देशात मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनला मागणीही वाढेल.

याबाबत प्रगत देश खूपच आघाडीवर आहेत. युरोपियन देश विमानाचे इंधन म्हणून ग्रीन हायड्रोजनचा वापर करीत आहेत. इतर काही देशांत रेल्वे, कार ग्रीन हायड्रोजनवर धावत आहेत.

याद्वारे प्रदूषण पातळी कमी करण्यात या देशांना यश आले आहे. या दिशेने भारताला जाण्यासाठी ग्रीन हायड्रोजन मिशन, अर्थसंकल्पातील तरतुदी आणि येत्या काळात याबाबत घेतले जाणारे धोरणात्मक निर्णय हेच जागतिक तापमानवाढीशी दोन हात करण्यासाठी निर्णायक टप्पे ठरतील.

Green Energy
Green Energy : साखर कारखाने उभारणार ५०० हरित ऊर्जा स्थानके

या सर्व पार्श्‍वभूमीवर साखर उद्योगाला यात कसे सहभागी होता येईल, याकरिता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघ तसेच ‘इंडियन शुगर मिल्स असोसिएशन’ या दोन शिखर संस्थांच्या पुढाकाराने ‘आयएसईसी’ तयार झाली आहे.

ही संस्था आतापर्यंत साखरेची आयात-निर्यात, साखरेबाबतचे इतर आंतरराष्ट्रीय व्यवहार करीत आली आहे. याच संस्थेमार्फत आता एका नवीन क्षेत्रात पदार्पण केले जात असून ते क्षेत्र म्हणजे हरित ऊर्जा स्थानके! पेट्रोलियम मंत्रालयाने नोव्हेंबर २०२१ मध्ये याठीचे सूचनापत्र काढलेले आहे.

त्याचा आधार घेऊन आयएसईसी हरित ऊर्जा स्थानके स्थापन करण्याचा परवाना घेणार आहे. असा परवाना घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने २०३० पर्यंत ५०० हरित ऊर्जा स्थानके उभारली जाणार आहेत.

हे उद्दिष्ट समोर ठेवूनच ‘आयएसईसी’ची वाटचाल सुरू आहे. राज्यात सहकारी साखर कारखान्यांचे ६० ते ६५ पेट्रोल पंप आहेत. याद्वारे डिझेल, पेट्रोल, इथेनॉलचे वितरण ते करीत आहेत.

हरित ऊर्जा स्थानकांद्वारे केवळ ग्रीन हायड्रोजनच नाही तर संपूर्ण बायो-बास्केट, अर्थात बायो-फ्यूएल (इथेनॉल), बायो-फर्टिलायझर्स (जैव खते) आणि ग्रीन हायड्रोजन यांच्या वितरणाची सोय कारखान्यांना उपलब्ध होईल.

कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळेल. आयएसईसीच्या मार्फत कारखान्यांना ही उत्पादने विक्रीचा अधिकृत उप-परवाना देण्यात येणार आहे.

आज आपण पाहतोय भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या व्यतिरिक्त इस्सार, रिलायन्स यांचे खासगी पेट्रोल पंप आहेत. तसेच साखर कारखान्यांचे ग्रीन एनर्जी पंप भविष्यात येतील.

सध्या हे सर्व प्राथमिक स्तरावर असले तरी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने याबाबत पुढाकार घेतला आहे.

याद्वारे प्रदूषण कमी करण्याच्या राष्ट्रीय धोरणाला हातभार लागेल, साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न साधन प्राप्त होईल, इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, देशाचे ‘ग्रीन मिशन’ यशस्वी होण्याच्या दिशेने हे एक पाऊल असणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com