Seed Treatment : बीजप्रक्रिया म्हणत्यात त्याला

बीजप्रक्रिया करायला सोपी आहे, कमी खर्चाची आहे. रासायनिक खते आणि कीडनाशके यांची बचत करून पैसे वाचविणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केलीच पाहिजेत.
Seed Treatment
Seed TreatmentAgrowon

महाराष्ट्र राज्यात चालू खरीप हंगामात (Kharif Season) सर्वच जिल्ह्यांमध्ये बीजप्रक्रिया (Seed Treatment) मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेला अप्रतिम असा प्रतिसाद मिळाला आहे. तीन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष बियाणे वापराच्या (Use Of Seed) तुलनेत एक टक्क्याहून कमी रासायनिक बीजप्रक्रिया (Seed Processing) केली जात होती, हे प्रमाण आता ८६ टक्क्यांच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेतही बीजप्रक्रियेचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत ९० हजारांहून अधिक महिला तर अनेक शेतकऱ्यांच्या गटांना सामावून घेण्यात आले होते. त्यामुळे हजारो गावे बीजप्रक्रियेच्या कक्षेत आली.

Seed Treatment
बीज प्रक्रिया केंद्र सुरू ठेवण्यास मुभा  दूध संकलन, विक्रीच्या वेळेतही बदल

‘बीजप्रक्रिया म्हणत्यात त्याला’ ही लावणी सध्या सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. बीजप्रक्रियेच्या महत्त्वाबरोबर विविध पिकांत बीजप्रक्रिया कशी करायची याचा संदेश या लावणीतून देण्यात आला आहे. वाशीमसारख्या जिल्ह्यात तर काही गावांतील शेतकऱ्यांनी यावर्षी खरिपात १०० टक्के बीजप्रक्रिया केल्याची नोंद आहे. या बीजप्रक्रियेचे चांगले परिणाम देखील शेतकऱ्यांना दिसत आहेत. बीजप्रक्रियेमुळे पिकांची उगवण चांगली होते. रोपे सतेज व जोमदार वाढतात. पीक उगवून आल्यानंतर २० दिवस ते महिनाभर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. जिवाणू खतांच्या बीजप्रक्रियेमुळे हवेतील नत्र शोषण करून पिकाला पुरविले जाते. तसेच जमिनीतील अविद्राव्य स्फूरद पिकांना उपलब्ध होतो. पर्यायाने पीक उत्पादनात वाढ होऊ शकते.

Seed Treatment
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढला

बीजप्रक्रियेचे असे अनेक फायदे असल्याने यांत सातत्य असणे गरजेचे आहे. अनेक वेळा एखाद्या तंत्रज्ञानाचा प्रसार-प्रचार मोहीम म्हणून केला असता तेव्हढ्यापुरता त्या तंत्रज्ञानाचा वापर वाढतो. सदरची मोहीम बंद झाली की ‘जैसे थे’ अशी स्थिती निर्माण होते. अर्थात शेतकऱ्यांकडून त्या तंत्राचा वापर कमी होत जातो. असे यापूर्वी अनेक तंत्रज्ञानाबाबत घडले आहे. तसे बीजप्रक्रियेचे होऊ नये, हीच अपेक्षा! सध्या हवामान बदलाचा काळ आहे. अशा काळात मशागतीपासून ते मळणीपर्यंत काटेकोर शेती नियोजनच शेतकऱ्यांना तारू शकते. बीजप्रक्रिया प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते. एक रासायनिक आणि दुसरी जैविक. उसासारख्या पिकामध्ये गरम पाणी, चुन्याच्या पाण्याची देखील प्रक्रिया केली जाते.

बीजप्रक्रिया करायला सोपी आहे, कमी खर्चाची आहे. विशेष म्हणजे पुढे रासायनिक खते आणि कीडनाशके यांची बचत करून पैसे वाचविणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केलीच पाहिजेत. असे असताना बीजप्रक्रिया कधी, कशाची आणि कशाप्रकारे करायची याची शास्त्रीय माहिती अनेक शेतकऱ्यांना नसल्यामुळे ते या महत्वाच्या प्रक्रियेपासून वंचित राहतात. प्रमाणित बियाणे असेल तर बीजप्रक्रिया करायची की नाही, अथवा कशाची करायची तसेच घरचे बियाणे शेतकरी वापरत असेल तर कशाची आणि कोणत्या क्रमाने बीजप्रक्रिया करायची याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधनाची गरज आहे.

अनेक वेळा कृषी विभागाकडून बीजप्रक्रियेबाबत तोंडी सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. परंतु त्यासाठीची आवश्यक रसायने अथवा जैविक खते शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाहीत. बीजप्रक्रियेचे महत्त्व पाहता पीकनिहाय बीजप्रक्रियेच्या निविष्ठा कृषी विभागाने अनुदानात पुरवायला हव्यात. बीजप्रक्रियेचे पीकनिहाय प्रात्यक्षिके घ्यायला हवेत. काही प्रमाणित बियाण्यावर केवळ बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया केलेली असते. खरे तर प्रमाणित बियाण्यावर बुरशीनाशकासह आवश्यक असेल तर कीटकनाशक तसेच जैविक खतांची पण प्रक्रिया केलेली असायला पाहिजेत. असे केल्यास शेतकऱ्यांचा बीजप्रक्रियेचा भार हलका होऊन त्यांच्या पिकांचे चांगले संरक्षण होईल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com