खरीप हंगाम २०२२ साठी महाराष्ट्र सज्ज

कोरोना काळातील बिकट परिस्थितीत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कृषी विभागाने केले. मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे.
खरीप हंगाम २०२२ साठी महाराष्ट्र सज्ज
Kharif SeasonAgrowon

कोरोना काळातील (Corona) बिकट परिस्थितीत अर्थव्यवस्थेला (Economy) बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कृषी विभागाने (Department Of Agriculture) केले. मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. राज्यातील सुशिक्षित तरुणतरुणी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. विविध शेती उत्पादनांच्या (Agriculture Produce) मूल्यवर्धनासाठी राज्यात प्रक्रिया उद्योगाची भरभराट होत आहे. महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हास्तरीय, विभागीय स्तरावर हंगामपूर्व बैठका घेऊन संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून, प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंमागासाठी दर्जेदार खते, बी-बियाणे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने विभागवार नियोजन करण्यात आले आहे. तसेच साठेबाजीला आळा घालण्यासाठी भरारी पथके स्थापन्यात आली आहेत.

मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहावर गुरुवारी (१९ मे) राज्यस्तरीय खरीप हंगाम, २०२२ पूर्व बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री श्रीमती अदिती तटकरे आदींसह राज्याचे मुख्य सचिव, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तसेच इतर विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चालू खरीप हंगामात सुमारे १४६.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर प्रमुख अन्नधान्य पिकांची लागवड अपेक्षित आहे. सदर क्षेत्रावरील पेरणीकरिता बियाणे बदलाचे प्रमाणानुसार सुमारे १७.९५ लाख क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. त्यानुसार ‘महाबीज’कडून १.७२ लाख क्विंटल, राष्ट्रीय बीजनिगम ०.१५ लाख क्विंटल व खासगी उत्पादकांमार्फत १८.०१ लाख क्विंटल असे एकूण १९.८८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षा अभियान वाणिज्यिक पिके कापूस व ऊस विकास कार्यक्रम ः

कापूस व ऊस पिकांत आंतरपीक पद्धतीस चालना देण्यासाठी मूग-उडीद आणि उसात हरभरा ही पीक पद्धती राबविण्यात आले. त्यामुळे मुख्य पिकासोबत अतिरिक्त उत्पन्न प्राप्त झाले आहे. सदर अभियानांतर्गत आंतर पीकपद्धतीवर आधारित कापूस व ऊस पिकांची अनुक्रमे ४८० आणि २३६० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. कापसाची अतिघन लागवड पद्धतीने लागवडीतची सुमारे १७६ हेक्टरवर प्रात्यक्षिक राबविण्यात आली. एकात्मिक कीड व्यवस्थापनाची जोड दिल्यामुळे मागील वर्षी कापसावरील बोडसड आणि हुमणी किडीच्या नियंत्रणात यश आले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अनधान्य पिके ः

सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके व भात पडीक क्षेत्रावर कडधान्य उत्पादन कार्यक्रम (TRE- Pulses) साठी एकूण सुमारे २२,४८४ लाख रकमेच्या कार्यक्रमास मंजुरी मिळाली होती. यामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानित दराने बियाणे वितरण, शेतकऱ्यांचे उत्पादन कार्यक्रम (FFS), एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन, सुधारित कृषी अवजारे व सुविधा इत्यादी बाबी आल्या आहेत. समाधानकारक पाऊस तसेच शेतकऱ्यांनी केलेले कष्ट व कृषी विभागाने राबविलेला विस्तार कार्यक्रम याची फलश्रुती २०२१-२२ मधील तिसऱ्या अंदाजानुसार कडधान्याचे ५२.०० लाख टन व एकूण धान्य पिकाचे १६५.०१ लाख टन इतके उत्पादन झालेले आहे.

शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनासाठी प्रति हेक्टरी कर्जदरानुसार कर्जपुरवठा केला जातो. पीकनिहाय कर्जदारनिश्‍चित करण्यासाठी नाबार्डमार्फत राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये सहकार आयुक्त, कृषी आयुक्त, राज्य सहकारी बँक, निवडक व्यापारी बँकतज्ज्ञ, शेतकरी तसेच नाबार्ड व रिझर्व बँकेकडील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. सदर समितीमार्फत सन २०२२-२३ साठी १४ मार्च व ५ एप्रिल २०२२ च्या सभेमध्ये विविध पिकांसाठी प्रति हेक्टरी कर्जदर त्याचप्रमाणे पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाचे कर्जदार निश्‍चित केले आहेत. सदरचे कर्जदर सर्व क्षेत्रीय कार्यालयांना किंवा बँकांना कळविण्यात आले आहेत. सदरचे दर किमान असून, या दरापेक्षा अधिक कर्जदराने कर्जदर निश्‍चितीची मुभा बँकांना आहे. सोबत कर्जदर परिशिष्ट क्र.१ वर जोडले आहेत.

पीकनिहाय कर्जदर

राज्यातील बँकामार्फत शेतकऱ्यांना पिकोत्पादनासाठी तसेच शेती सुधारणेसाठी विविध प्रकारची कर्जे दिली जातात. शेतकऱ्यांना पिकोत्पादनासाठी निश्‍चित केलेल्या दराने प्रति हेक्टरी कर्जदरानुसार कर्जपुरवठा केला जातो. पीकनिहाय कर्जदार निश्‍चित करण्यासाठी नाबार्डमार्फत राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये सहकार आयुक्त, कृषी आयुक्त, राज्य सहकारी बँक, निवडक व्यापारी बँका तज्ञ शेतकरी तसेच नाबार्ड व रिझर्व बँकेकडील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. सदर समितीमार्फत सन २०२२-२३ साठी दिनांक १४ मार्च २०२२ व ५ एप्रिल २०२२ च्या सभेमध्ये विविध पिकांसाठी प्रति हेक्टरी कर्जदर त्याचप्रमाणे पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाचे कर्जदार निश्‍चित केले आहेत व सदरचे कर्जदर सर्व क्षेत्रीय कार्यालयांना/ बँकांना कळविण्यात आले आहेत. सदरचे दर किमान असून या दरापेक्षा अधिक कर्जदराने कर्जदर निश्‍चितीची मुभा बँकांना आहे.

नाबार्ड पतपुरवठा आराखडा

नाबार्डमार्फत प्रतिवर्षी राज्यासाठी व सर्व जिल्ह्यांसाठी क्षमताधिष्ठीत पतपुरवठ्याचा आराखडा (Potential Linked Credit Plan) तयार करण्यात येतो. नाबार्डमार्फत राज्यासाठी सन २०२२-२३ साठी एकूण ६१३५०३ रुपये इतक्या रकमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात कृषी, कृषिपूरक, व कृषी पायाभूत सुविधांसाठी एकूण १४३०१९ कोटी रुपये रकमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सन २०२२-२३ साठी पीककर्ज पुरवठा

जिल्हास्तरीय समन्वय समित्यांमार्फत त्याचप्रमाणे राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्या मार्फत सन २०२२-२३ हंगामासाठी अंतिम लक्ष्यांक निश्‍चिती कार्यवाही सुरू आहे. सन २०२२-२३ मधील पीककर्ज वाटपाचा अंतरिम लक्ष्यांक पुढीलप्रमाणे आहे. शेतकरी संख्या ६७.३२ लाख व रक्कम ५९३५० कोटी रुपये.

कृषिनिविष्ठा पुरवठा

सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामातील राखून ठेवलेले बियाणे वापरण्यापूर्वी तपासणी करून घ्यावी. त्यानंतर बियाण्यांची योग्य मात्रा पेरणीसाठी वापरावी. याबाबत प्रमाणात सोयाबीन बियाणे मोहीम राबविण्यात आलेली होती. यानुसार राज्यामध्ये शेतकऱ्यांनी घरचे तयार केलेले ४५.०९,७४६ इतके उपलब्ध झालेले आहे. याबरोबरच उन्हाळी २०२१-२२ हंगामात सोयाबीन घेण्यात आलेला असून ६२,९२८ क्षेत्रावर रब्बी/ उन्हाळी पेरणी करण्यात आली आहे. रब्बी/उन्हाळी सोयाबीन पिकाचे अंदा उत्पादन २,७७,४०२ होणार असून, स्थानिक पातळीवर घरचे सोयाबीन बियाणे मोहिमेद्वारे ४८,१७, ४८३ उपलब्ध झाले आहे. राज्यामध्ये बियाणे उपलब्धतेसाठी एकूण २५ बीज प्रक्रिया केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे.

----------------

(शब्दांकन : दीपक नारनवर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com