Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा पुन्हा नको विळखा

जनावरांचे बाजार सुरू झालेले असताना घातक लम्पी स्कीन आजाराची पुन्हा लागण होऊ नये, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून संबंधित सर्व घटकांनी योग्य ती काळजी घ्यायला हवी.
Livestock
LivestockAgrowon

बाजार मग तो नित्योपयोगी उत्पादनांचा असो, शेतीमालाचा (Agriculture Market) असो की जनावरांचा (Livestock Market), ते बंद असण्याचे काय तोटे असतात, याची चांगली जाण आपणा सर्वांना कोरोना (Corona) काळात आली आहे. बाजार बंद हा उत्पादक - मध्यस्थ - ग्राहक अशा तिन्ही बाजार घटकांच्या मुळावर उठणारा असतो. त्यामुळेच शक्यतो बाजार बंद राहणार नाही, अपरिहार्य परिस्थितीत बंद केला तर तो फार काळासाठी राहणार नाही, याची काळजी घेतली जाते.

Livestock
Lumpy Skin : लम्पी स्कीन आजारामुळे २२१ जनावरे दगावली

लम्पी स्कीन या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर जनावरांचे बाजार, शर्यती मागील चार महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी तसेच बाजार समित्यांचे देखील नुकसान होत होते. आता राज्यात जवळपास सर्वच जनावरांचे लसीकरण झाले आहे, ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भावही कमी झाला आहे. त्यामुळे जनावरांचे बाजार तसेच बैलगाडा शर्यती सुरू करण्याचे आदेश महसूल व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.

बाजार बंद असताना शेतकऱ्यांना गाय - म्हैस - बैल - वासरे असे पशुधन खरेदी - विक्री करता येत नव्हते. त्यामुळे त्यांची शेतीची कामे खोळंबली होती. काही शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायात अडचणी आल्या. शिवाय आर्थिक अडचणीत एखादे जनावर विकून नड भागविणे, असे ही काही शेतकऱ्यांचे नियोजन असते.

Livestock
Lumpy Skin : मृत पशुधनासह नैसर्गिक आपत्तीची भरपाई मिळावी

त्यालाही आळा बसला होता. आता जनावरांचे बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या या सर्व अडचणी दूर होतील. तसेच दुभती गाय, गाभण गाय, बैल यांच्या दरात २० टक्के वाढ झाल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. असे असले तरी घातक लम्पी स्कीन आजाराची पुन्हा लागण होऊ नये, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून संबंधित सर्वच घटकांनी काळजी घ्यायला हवी.

लम्पी स्कीन आजाराने राज्यात आतापर्यंत ३० हजारांहून अधिक जनावरे दगावली आहेत. लम्पी स्कीनने जनावर मृत्युमुखी पडले असल्यास त्यासाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली असली, तरी त्यापासून अनेक पशुपालक वंचित आहेत. राज्यात सर्वच जनावरांचे लसीकरण झाले असे सांगितले जात असले, तरी काही पशुधन यापासून वंचित आहे. काही पशुपालकांनी आपल्या जनावराचे लसीकरण करून घेतले नाही, तर काही जनावरांपर्यंत पशू संवर्धन विभाग पोहोचू शकला नाही.

लसीकरण झाले तरी काही जनावरांना लम्पी स्कीनची लागण झालेली आहे. बैलगाडा शर्यतीत भाग घेतलेल्या काही बैलांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचेही पुढे आले आहे. आता तर राज्यात सर्वत्र यात्रा-जत्रा, पशुप्रदर्शने-बाजार, उरूस-उत्सव सुरू झाले आहेत. यामध्ये जनावरे एकत्र येतात. त्यामुळे या सर्वांतून लम्पी स्कीनची लागण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनावरांचे बाजार, जत्रा-यात्रा यात लसीकरण न झालेले जनावर येणार नाही, हे पाहायला हवे.

त्याकरिता बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांचे लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केले पाहिजे. पशुपालकांनी सुद्धा लसीकरण केलेलेच जनावर बाजारात न्यावे. बाजारात नेण्यात येत असलेल्या जनावरांच्या कानात टॅगसुद्धा असायला हवा. या टॅगमध्ये संबंधित जनावरांच्या मालकापासून ते लसीकरणापर्यंत अशी सर्व माहिती असते.

शिवाय बाजारात नेण्यासाठीच्या जनावरांच्या वाहतुकीसाठीचा पशुवैद्यकाने दिलेला दाखलासुद्धा आवश्यक आहे. असे दाखले, प्रमाणपत्र पशुपालकांना तत्काळ मिळतील, ही काळजी पशू संवर्धन विभागाने घ्यायला हवी. तर असे दाखले, प्रमाणपत्र असलेली जनावरेच बाजारात येतील, ही खबरदारी बाजार समितीने घ्यायला हवी. असे झाले तरच जनावरांच्या बाजारातून लम्पी स्कीन वाढणार नाही आणि पुन्हा बाजार बंद करण्याची वेळ देखील येणार नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com