Cotton Export : आता वाढवा कापसाची निर्यात

कापूस, रुई, सूत निर्यातीसाठी देशात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उत्पादक, व्यापारी, निर्यातदार आणि सरकार अशा सर्व घटकांनी कापूस, सूत, रुई यांची निर्यात वाढेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
Cotton Export
Cotton Export Agrowon

मागील वर्षी देशात कापसाचे उत्पादन (Cotton Production) ३५४ लाख गाठी झाले होते. यावर्षी अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि गुलाबी बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावाने कापसाचे खूप नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन घटून ते ३१५ ते ३४० लाख गाठींवर येईल, असा अंदाज आहे. उत्पादनाच्या अंदाजातही २५ लाख गाठींची तफावत असून विविध संस्था संघटनांनी आपापल्या सोयीने अंदाज वर्तविले आहेत, हेच यावरून स्पष्ट होते. शेतकऱ्यांनी ९० टक्के कापूस अजूनही घरात दाबून ठेवला आहे, ते बाजारात कापूस आणत नाहीत.

Cotton Export
Cotton export: आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी का घटली ?

त्यामुळे बाजारात कापसाचा तुटवडा आहे. अशी ओरड व्यापारी, कापड उद्योजकांनी मागील काही दिवसांपासून चालू आहे. आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत देशात कापसाचे, रुईचे दर अधिक होते, त्यावेळी पण व्यापारी, कापड उद्योजकांच्या पोटात गोळा उठत होता. त्यामुळे त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे कापसावर असलेले ११ टक्के आयातशुल्क रद्द करण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती.

Cotton Export
Cotton Rate : गुजरातमधून कापसाची खरेदी सुरू

परंतु याला छेद देणारी बातमी नुकतीच येऊन धडकली आहे. देशांतर्गत बाजारात ११० लाख कापूस गाठ्यांची आवक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस दाबून ठेवल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. महत्त्वाचे म्हणजे आता रुईचे दरही घटून जागतिक बाजारातील दराएवढेच (५७ हजार ५०० रुपये प्रतिखंडी) झाले आहेत. त्यामुळे कापूस, रुई, सूत निर्यातीसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले असून देशातून अधिकाधिक कापूस, सूत, रुई निर्यातीसाठी सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजेत.

कापसाचे दर ९ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेले होते, ते आता कमी होऊन ७५०० रुपयांवर स्थिरावले आहेत. हा दर हमीभावापेक्षा थोडा अधिक असला तरी कापसाचे घटते उत्पादन आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमीच म्हणावा लागेल. यावर्षी कापसाचे उत्पादन घटणार असले तरी आपली देशांतर्गत गरज (२९३ लाख गाठी) भागवून ३० ते ४० लाख कापूस गाठी आपण निर्यात करू शकतो. कापसाचा सर्वांत मोठा आयातदार देश चीन आहे.

Cotton Export
Cotton Production : यंदाच्या हंगामातील कापसाची प्रत उत्तम

मागील काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने या देशाची आयात-निर्यात ठप्प झाली आहे. परंतु आता चीनमधील कोरोना नियंत्रणात असून नवीन वर्षात लवकरच चीन सर्व देशांशी आयात-निर्यात सुरळीत चालू करणार आहे. चीनने यापूर्वीच जागतिक बाजारातून जवळपास १५० लाख कापूस गाठी आयात करेल, असे संकेत दिले होते. त्यामुळे चीन आपल्याकडून मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करू शकते.

जानेवारीनंतर त्यांच्याकडून सुताची देखील मागणी वाढू शकते. बांगला देश सुद्धा आपल्याकडून रुई घेऊन त्यापासून सूत व कपडे तयार करून इतर देशांना विकते. त्यामुळे बांगला देश कडूनही कापूस, रुईची मागणी वाढू शकते. दोन वर्षांपासून चीनमधून होत असलेली कपड्यांची आयात अमेरिकेने थांबविली आहे. त्यामुळे अमेरिका आपल्याकडून कपड्यांची आयात करू शकते. या सर्व परिस्थितीचा विचार करून भारतीय निर्यातदारांनी कापूस, रुई, सूत, तयार कपडे जगभर पोहोचतील हे पाहावे.

केंद्र सरकारने सुद्धा कापूस ते कापड निर्यातीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. देशातील कापूस ते कापड अनुदान देऊन बाहेर काढले पाहिजेत. नाताळच्या सुट्ट्यांनंतर सूत गिरण्या, कपडा उद्योग पुन्हा सुरू झाल्यावर देशांतर्गत बाजारातून कापसाला मागणी वाढू असते. आता आंतरराष्ट्रीय
पातळीवरील व देशांतर्गत रुईचे दर समान झाल्याने उद्योजकांची रुई, सूत बाहेरून आयात करण्याच्या भानगडीत पडू नये. असे झाल्यास पुन्हा कापसाची मागणी वाढून दर सुधारतील आणि पांढरे सोने पुन्हा झळाळू लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com