Cotton : पांढऱ्या सोन्यातील संधी!

घटते उत्पादन, कमी होत असलेला साठा आणि उद्योगाकडूनची वाढत जाणारी मागणी यामुळे आपल्याला कापसाची आयात वाढवावी लागेल, असे चित्र आहे. कापूस लागवड, उत्पादन आणि निर्यातीमध्ये अग्रेसर भारत देशासाठी हे चित्र चिंताजनक म्हणावे लागेल.
Cotton
Cotton Agrowon

गेल्या वर्षी स्थानिक ते जागतिक पातळीवर मागणी पुरवठ्यातील तफावतीने पूर्ण हंगामभर कापसाचे दर (Cotton Rate) चांगले राहिले. गेल्या वर्षी सरासरी १० हजार रुपये प्रतिक्विंटल कापसाला दर मिळाला. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात कापूस लागवडीकडे (Cotton Cultivation) देशभरातील शेतकऱ्यांचा कल वाढला. देशात कापूस लागवड क्षेत्र १० टक्क्यांनी वाढून ते १३५ लाख हेक्टरवर (Cotton Acreage) पोहोचले आहे. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन पाकिस्तान या देशांतही यंदा लागवड बऱ्यापैकी असली तरी भारतासह बहुतांश देशांत नैसर्गिक आपत्तींमुळे कापसाचे पीक संकटात (Cotton Crop In Crisis Due To Natural Calamity) सापडले आहे.

Cotton
Cotton : कापूस उत्पादकांसमोर आता किडींचे संकट

भारतातील कापसाबाबत बोलायचे झाले तर यंदा जूनमधील पावसाच्या उघडिपीने लागवडी लांबल्या. त्यात महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने कापसाचे खूप नुकसान झाले. शिवाय सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर गुलाबी बोंड अळीचा उद्रेक सर्वत्र पाहावयास मिळतोय. त्यामुळे मागील काही वर्षांपासून दुसऱ्या तिसऱ्या बहराच्या कापसाच्या उत्पादनात मोठी घट होत आहे. भारतात यंदा ४०० लाख कापूस गाठी उत्पादनाचा अंदाज पहिल्यांदा वर्तविण्यात आला होता. परंतु आता मात्र कापसाचे उत्पादन घटून ३१५ लाख गाठींवर स्थिरावण्याची शक्यता असल्याचे बोलले जातेय.

Cotton
Cotton : सामूहिक कापूस शेती फायदेशीर ः डॉ.मायी

अमेरिकेतसुद्धा ४० टक्के कापूस पिकाला नैसर्गिक आपत्तींचा फटका बसून एकूण उत्पादन २० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे. चीनचा भर सुद्धा कापसाची लागवड नियंत्रणात ठेवून आयातीवरच अधिक आहे. त्यामुळे तेथे उत्पादन वाढणार नाही तर चीनकडून कापसाची आयातच वाढेल. पाकिस्तान, बांगलादेश यांच्याकडूनही कापसाची मागणी वाढणार आहे. त्यातच चीन-अमेरिकेमध्ये सुरू असलेले शीतयुद्ध आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक व्यापाराची समीकरणे बदलली आहेत, वरचेवर बदलत आहेत.

दोन वर्षे चाललेली कोरोना महामारी आणि त्यानंतरचे रशिया-युक्रेनचे युद्ध यामुळे सर्वच देश अन्नधान्यांसह कापूस आणि इतर औद्योगिक शेतीमालाचा साठा करून ठेवत आहेत. त्याचाही जागतिक व्यापारावर परिणाम होतोय. भारतात ६० लाख गाठींचा अतिरिक्त साठा असतो. परंतु कमी उत्पादनामुळे हा साठा या वर्षी नीचांकी पातळीवर येणार आहे. घटते उत्पादन, कमी होत असलेला साठा आणि उद्योगाकडूनची वाढत जाणारी मागणी यामुळे आपल्याला कापसाची आयात वाढवावी लागेल, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले होते. या सर्व बाबी कापूस लागवड, उत्पादन आणि निर्यातीमध्ये अग्रेसर भारत देशासाठी चिंताजनक म्हणाव्या लागतील.

कापूस हे भारताचे प्रमुख नगदी पीक आहे. कापसाची लागवड दक्षिण, उत्तर आणि मध्य भारतात होते. लागवडीत आघाडीवरचा आपला देश कापूस उत्पादकतेत मात्र खूपच पिछाडीवर आहे. आपली कापसाची उत्पादकता केवळ ४६९ किलो प्रतिहेक्टर आहे. चीन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांची कापूस उत्पादकता आपल्या दुपटी-तिपटीने अधिक आहे. बीटी कापसाच्या आगमनानंतर देशात मागील दोन दशकांत नवीन वाणांच्या बाबतीत थंडावलेले संशोधन, देशी वाणांचे संशोधन आणि विकासाला बसलेली खीळ, लागवडीबाबत प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव, कीड-रोगांचा उद्रेक आणि त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांच्या पातळीवरील गोंधळ, कापूस पिकात लागवड ते वेचणीपर्यंत यांत्रिकीकरणाचा अभाव यासह कापसाची खरेदी ते पुढील प्रक्रिया याचाही क्लस्टरनिहाय विकास न झाल्यामुळे आपली उत्पादकता कमी असून उत्पादक आर्थिक अडचणीत आहेत. या सर्व बाबींवर शासन-प्रशासन पातळीवर गांभीर्याने विचार झाला पाहिजेत. बदलती जागतिक परिस्थिती पाहता कापसाची उत्पादकता वाढवून तो जगभर निर्यातीची संधी आपल्या देशाला आहे. त्या दिशेने नियोजनकर्त्यांनी धोरणांची आखणी-अंमलबजावणी करायला हवी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com