Orange : कहर ‘वाय-बहर’चा!

सिट्रस ग्रीनिंगवर प्रभावी उपायांसाठी संशोधनाचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्याची वेळ आता आली आहे.
Orange
OrangeAgrowon

विदर्भात उन्हाळ्यात ४० अंश सेल्सिअसच्या वर गेलेला तापमानाचा (Temperature) पारा आणि आता जुलै महिन्यापासून लागून असलेला पाऊस यामुळे संत्रा उत्पादक (Orange Producer) फळगळतीने (Orange Fruit Fall) त्रस्त झाले आहेत. त्यातच आता वाय-बहरचा (Orange Y Blossom) कहर सुरू असल्याने संत्रा बागायतदार चांगलेच जेरीस आले आहेत. सिट्रस ग्रीनिंग (Citrus Greening) नावाच्या जिवाणूमुळे वाय-बहरचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा वाहक सिट्रस सायला ही कीड आहे. वाय-बहर येण्यामागे शारीरिक विकृती आणि संप्रेरकांचे असंतुलनही एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

या रोगाचे शेतकऱ्यांच्या पातळीवर लवकर निदान होत नाही. उशिरा निदान झाले तर प्रभावी उपाय योजना नाहीत. त्यामुळे रोगवाहक किडीचे नियंत्रण करा, पोषक घटकांचा संतुलित वापर करा, एवढे करूनही रोग आटोक्यात येत नसेल तर रोगग्रस्त फांद्या-झाडे काढून टाका, अशा मोघम उपाय योजना तज्ञांकडून सांगितल्या जातात. लवकर रोगनिदानासाठी पाने-फांद्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी लागते. ही तपासणी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, (सीसीआरआय) नागपूर येथे केली जाते. परंतु नेमके नमुने कधी, कसे, कुठे पाठवायचे हे अनेक संत्रा उत्पादकांना माहीत नाही.

Orange
Sweet Orange : मोसंबी फळगळमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

एक नमुना तपासणीसाठी शेतकऱ्यांना एक हजार रुपये खर्च येतो. गंभीर बाब म्हणजे कृषी विद्यापीठ आणि सीसीआरआय या दोन्ही संस्थांकडून वाय-बहरचा प्रादुर्भाव, रोगनिदान आणि उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे. त्याचे परिणाम देखील संत्रा उत्पादक भोगत आहेत. प्रादुर्भावग्रस्त बागेतील फळांचा आकार वेडावाकडा होत असल्याने व्यापारी सौदे निम्म्यावर सोडत आहेत. जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना संत्रा बागा काढून टाकाव्या लागत आहेत.

Orange
Orange : संत्रा बागायतदार वाय-बहरमुळे जेरीस

आपल्या देशात १९७० मध्ये पहिल्यांदा सिट्रस ग्रीनिंगचा प्रादुर्भाव पहिल्यांदा नोंदविण्यात आला. तेव्हापासून या रोगाचे प्रादुर्भाव क्षेत्र सातत्याने वाढत आहे. महाराष्ट्रासह पंजाब, कर्नाटक, आसाम, सिक्कीममध्ये लिंबूवर्गीय फळबागा या रोगाने ग्रस्त आहेत. या रोगाच्या नियंत्रणात ९७ टक्के यश आल्याचा दावा सीसीआरआयकडून सुमारे तीन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. त्यावेळी आयआयटी रुडकी, युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा (अमेरिका) आणि सीसीआरआय यांच्या संयुक्त संशोधनातून सिट्रस ग्रीनिंगवर प्रभावी नियंत्रण शक्य झाल्याचे सांगण्यात आलो होते. परंतु आज संत्रा पट्ट्यात वाय - बहरचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरे तर आता सिट्रस ग्रीनिंगवर प्रभावी उपायांसाठी संशोधनाचा कालबद्ध कार्यक्रम ठरविण्याची वेळ आली आहे. ही समस्या उद्यानविद्या, पीक पोषणशास्त्र, वनस्पती कीटकशास्त्र आणि रोगशास्त्र अशा विविध विभागांशी संबंधित आहे. त्यामुळे यावर तुटक-तुटक संशोधन होण्याऐवजी या सर्व विभागातील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन संशोधन करायला पाहिजेत. या संशोधनात कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि सीसीआरआय अशा सर्व संस्थांचा एकत्रित सहभाग देखील आवश्यक आहे.

अशा विविध संस्था, विविध विभाग यातील तज्ज्ञांची एक समिती नियुक्त करून त्यांना ठरावीक वेळेत प्रभावी उपाय देण्याचे सांगायला हवे. जगभरातील लिंबूवर्गीय पिकांमधील प्रमुख समस्या म्हणून सिट्रस ग्रीनिंगकडे पाहिले जात असताना यात बाहेर देशांत कुठे, काय संशोधनाचे काम चालू आहे हेही या समितीने पाहायला पाहिजे. या संशोधनामध्ये रोपवाटिकेपासून ते फळांची तोडणी होईपर्यंत शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायची हे पुढे आले पाहिजेत. हे संशोधन अथवा उपाय योजना तत्काळ सर्व संत्रा उत्पादकांपर्यंत पोहोचवाव्या लागतील.

सर्व संत्रा उत्पादकांकडून या उपाय योजनांचा अवलंब होईल, हेही पाहायला हवे. असे झाले तरच राज्यातील संत्रा आणि देशभरातील लिंबूवर्गीय फळपिकांच्या बागा वाचतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com