Purnathadi Buffalo : राष्ट्रीय मानांकन मिळाले, पुढे काय?

पूर्णाथडी म्हैस आणि कठानी गाई या दोन्ही प्रजातींच्या राष्ट्रीय मानांकनानंतर त्यांच्या संशोधनाला आता पाठबळ मिळायला पाहिजे.
Purnathadi Buffalo
Purnathadi BuffaloAgrowon

आज आपण पाहतोय, काही पारंपरिक पिके (Traditional Crop), त्यांचे देशी वाण अतिदुर्लक्षितपणामुळे नामशेष होत आहेत. पिकांप्रमाणे स्थानिक पशुधनाची (Indigenous Livestock) पण तिच गत आहे. गाई-म्हशी (Cow Buffalo Rearing) असो की शेळ्या-मेंढ्या (Goat Sheep farming) यांच्या स्थानिक जातींची कुठे नोंदणी नाही, त्यांच्यावर संशोधन विकासाचे काही काम होत नसल्याने असे पशुधन लुप्त होत आहे.

Purnathadi Buffalo
Purnathadi Buffalo : अखेर पूर्णाथडी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन

आपल्या देशातील पारंपरिक पशुधन नष्ट होऊ नये म्हणून त्यांच्या नोंदणीचे काम कर्नाल येथील भारतीय कृषी संशोधन केंद्रांतर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन संस्था करते. या संस्थेने नुकत्याच १० नवीन पशुधन प्रजातींची नोंदणी केली आहे. त्यांच्या या नोंदणीत विदर्भातील पूर्णाथडी म्हैस आणि कठानी गाईचा समावेश करण्यात आला आहे.

Purnathadi Buffalo
Animal Care : निकृष्ट चारा, पशुखाद्याचे वाढवा पोषणमूल्य

विदर्भातमध्ये उष्णतामान फार आहे. उन्हाळ्यात येथील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर जाते. विदर्भात वर्षभर हिरवा चारा मिळत नाही, पाण्याचेही दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे संकरित गाई-म्हशी संगोपन येथे फारसे प्रचलित झाले नाही. त्याच वेळी येथील स्थानिक काटक गाई-म्हशी-शेळ्या-मेंढ्यांच्या प्रजातींचे पण योग्य संवर्धन-संगोपन झाले नाही. त्यामुळे दुग्धोत्पादनासह इतरही पशुधन पूरक व्यवसायांत विदर्भ मागे राहिला आहे.

Purnathadi Buffalo
Animal Care : लक्षणांवरून ओळखा जनावरांतील रेबीज

बदलत्या हवामान काळात अडचणीत आलेली जिरायती शेती अन् शेतीपूरक व्यवसायातही प्रगती नसल्यामुळे या भागात अधिक शेतकरी आत्महत्या होतात, हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. पूर्णाथडी म्हैस फिक्कट भुऱ्या, राखाडी रंगाची असून पश्‍चिम विदर्भातील अति उष्णतामानात ती तग धरून राहते. विशेष म्हणजे पश्‍चिम विदर्भात स्थानिक पातळीवरील उपलब्ध चाऱ्यावर त्या जगतात. उन्हाळ्यात या भागात हिरवा चारा मिळणे दुरापास्त असताना या म्हशी केवळ कोरड्या चाऱ्यावर चांगले दूध उत्पादन देतात.

या म्हशीच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तुपासाठी या म्हशी चांगल्या मानल्या जातात. तूप अधिक प्रमाणात आणि रवाळ मिळते. कठानी गाय ही पांढऱ्या रंगाची असून, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदीया या भागांत ती आढळून येते. या भागातील भात शेती ही बैलचलित यंत्रावर प्रामुख्याने केली जात असून, कठानी बैल चिखलातील भात शेतीसाठी उत्तम मानले जातात.

स्थानिक परिस्थितीत उपलब्ध चारा आणि थोड्याबहुत देखभालीत कठानी गाई बऱ्यापैकी दूधही देतात. स्थानिक पातळीवर उपयुक्त अशा या दोन्ही पारंपरिक प्रजातींची अधिकृत नोंदणी झाल्यामुळे त्यांना आता राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. आता या दोन्ही प्रजाती नोंदणीकृत जनावरांच्या यादीत येऊन बसल्या आहेत. त्यामुळे देशातच नाहीतर जगभर त्यांची ओळख होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नोंदणीकृत पशुधनाची बाजारात मागणी अधिक असते, त्याला दरही चांगले राहतात.

यांच्या खरेदी-विक्रीत पशुपालकांना फायदा होऊ शकतो. ज्या पशुपालकांकडे हे पशुधन आहे, त्यांना राष्ट्रीय मानांकनाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना त्यांच्या शास्त्रीय संगोपनाची माहिती पशुतज्ज्ञांनी द्यायला हवी. पूर्णाथडी म्हैस आणि कठानी गाई या दोन्ही प्रजातींच्या राष्ट्रीय मानांकनानंतर त्यांच्या संशोधनाला पाठबळ मिळायला पाहिजे. या दोन्ही प्रजातींचे संशोधन-संवर्धन-विकास प्रकल्प शासनाने हाती घेतले पाहिजेत. शिवाय शासकीय पशुधन वाटप कार्यक्रमामध्ये पूर्णाथडी म्हैस आणि कठानी गाईंना स्थान मिळायला हवे.

पश्‍चिम विदर्भात मुऱ्हा किंवा जाफराबादी म्हशी तसेच पूर्व विदर्भात संकरित जर्शी गाई फारशा टिकाव धरताना दिसत नाहीत. त्यामुळे पश्‍चिम विदर्भात पूर्णाथडी रेडे आणि पूर्व विदर्भात कठानी वळूच्या सिद्ध रेतमात्रा (वीर्यकांड्या) कृत्रिम रेतन कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाने वापरायला हव्यात. असे झाले तर प्रतिकूल परिस्थितीतही या भागात एकंदरीतच पशुसंवर्धन तसेच दुग्धोत्पादनाला चालना मिळेल, शेतकऱ्यांना आर्थिक स्रोत उपलब्ध होऊन त्यांच्या आत्महत्या थांबण्यास हातभार लागू शकतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com