APMC:कुंडली उघडी करणारी क्रमवारी

बाजार समित्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीची तालुका उपनिबंधक किंवा सहायक निबंधक प्रत्यक्ष भेट घेऊन व तपासणी करून गुण देणार आहेत.
APMC
APMCAgrowon

बाजार समित्यांच्या लेखा परीक्षणात सहकारी संस्थांप्रमाणे क्रमवारी ठरत नाही. त्यामुळे बाजार समित्यांच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गतच्या क्रमवारीला विशेष महत्त्व आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीवर पहिल्यांदाच वार्षिक क्रमवारी (रॅंकिंग) ठरविण्यात येणार आहे.

बाजार समित्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीची तालुका उपनिबंधक किंवा सहायक निबंधक प्रत्यक्ष भेट घेऊन व तपासणी करून गुण देणार आहेत. अशा वस्तुनिष्ठ माहिती व गुणांच्या आधारे पणन संचालक बाजार समित्यांची (APMC) क्रमवारी जाहीर करणार आहेत.

APMC
FCI: तेलंगणात तांदूळ प्रक्रियेसाठी मुदतवाढ

त्यामुळे प्रत्येक बाजार समितीला इतर बाजार समित्यांच्या तुलनेत आपण कोठे आहोत, हे कळेल. शेतकऱ्यांपासून ते बाजार समितीतील इतर घटकांसाठी सुद्धा ही क्रमवारी महत्त्वाची असेल. शेतकऱ्यांना आपण कशा प्रकारच्या अथवा कोणत्या क्रमवारीच्या बाजार समितीत आपला शेतीमाल घालत आहोत, हे कळणार आहे.

क्रमवारी ठरविणाऱ्या गुणांच्या निकषांमध्ये पायाभूत सुविधा (रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह) इतर सेवा सुविधा (इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, गोदाम, शीतगृह, लिलावगृह, प्रतवारी सुविधा, संगणकीकरण) यांसह आर्थिक परिस्थिती, योजनांची अंमलबजावणी, आस्थापना खर्च, खरेदीदारांचे दप्तर, अडत्यांच्या वजनमापांची तपासणी, तेथे होणारी स्पर्धा तसेच शेतीमालास बाजारभाव कशा पद्धतीने दिला जातो आदी महत्वांच्या घटकांचा समावेश करण्यात आल्यामुळे या क्रमवारीतून बाजार समित्यांची कुंडलीच उघड होणार आहे.

APMC
Kharif Sowing : भात लागवड क्षेत्रात १३ टक्क्यांची घट

आज आपण पाहतोय अनेक बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्री-साठवण-प्रक्रिया यांच्या अनुषंगाने काहीही सेवासुविधा नाहीत. एवढेच नाही तर हमाल-मापारी-अडते-व्यापारी हे सर्व बाजार घटक विविध पद्धतीने, तसेच अनेक कुप्रथांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट करतात. शेतीमालास रास्तभावही अनेक वेळा नाकारला जातो.

अशा सर्वच बाजार समित्यांच्या चांगल्या-वाईट अशा दोन्ही बाजूंचे प्रतिबिंब क्रमवारीत येणार आहे. एक प्रकारे बाजार समित्यांना आरसा दाखविण्याचे काम ही स्मार्ट क्रमवारी करणार आहे. राज्यातील कृषी बाजार व्यवस्थेतील हा पहिलाच प्रयत्न असल्याने निकषांमध्ये वारंवार दुरुस्त्या कराव्या लागतील. सुधारणांच्या अनुषंगाने काही नवीन निकष घालता येतील का, हेही वरचेवर पाहावे लागेल.

APMC
Water Pollution: जलप्रदूषणामुळे पंजाबला शंभर कोटींचा दंड

बाजार समित्या (APMC) या काही सहकारी संस्था नाहीत, त्या स्थानिक संस्था आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या लेखा परीक्षणात सहकारी संस्थांप्रमाणे क्रमवारी ठरत नाही. त्यामुळे कुठल्या बाजार समितीत नेमक्या काय सुविधा आहेत, त्यांचे एकंदरीत कामकाज कसे सुरू आहे, हे लेखा परीक्षणाने लक्षात येत नाही. त्यामुळे बाजार समित्यांची स्मार्ट प्रकल्पांतर्गत क्रमवारी ठरलीत पाहिजे.

आतापर्यंत बाजार समित्यांमध्ये काही सुधारणा होणार असतील तर त्यास विरोध करण्याचे काम यातील काही घटकांकडून झाले आहे. बाजार समित्यांची क्रमवारी हाही सुधारणांच्या अनुषंगानेच उचललेले एक नवीन पाऊल आहे. त्यामुळे या गुणांकावरून अथवा क्रमवारीवरून माझी बाजार समिती क्रमावारीत तळाला अन् त्यांची वर कशी, असे राजकीय वादंग कोणी उठवू करू नये.

APMC
sugar exports: केंद्राकडून लवकरच अतिरिक्त साखर निर्यातीला मंजुरी?

क्रमवारीतील वरच्या बाजार समित्यांतील नेमक्या कोणत्या निकषांवर आपल्याला काम करावे लागेल, हे खालच्या क्रमवारीतील बाजार समित्यांना कळेल. एक निकोप स्पर्धा म्हणून सर्वच बाजार समित्यांनी या क्रमवारीकडे पाहायला हवे.

उद्या एखाद्या बाजार समितीला कळले की लिलावगृहामुळे आपले गुण कमी झाल्यामुळे आपली क्रमवारी घसरली तर ती बाजार समिती ‘शॉपिंग कॉम्प्लेक्स’ सोडून आधी लिलावगृह बांधेल. अर्थात, सुधारणांसाठीचा प्राधान्यक्रमसुद्धा या क्रमवारीने कळणार आहे. त्यामुळे एक चांगला उपक्रम बंद पाडण्याचे काम कोणीही करू नये. उलट तसा प्रयत्न कोणी करीत असेल तर तो हाणून पाडण्याचे काम सर्वांनी करायला हवे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com