काटेरी वाट...

विविध सुंदर फुलांमध्ये देखील काटे विखुरले असतात म्हणून फुलझाडे फुले उगविणे सोडत नाहीत. मनुष्याच्या जीवनात देखील भरपूर काटे (समस्या) असतात म्हणून हताश, उदास न होता काट्यांतून वाटा शोधण्याची दृष्टी मानवाने निर्माण करायला हवी.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

मानवी जीवनासह पृथ्वीवर वावर असलेल्या सर्व जिवांना जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. जीवनात नंदनवन फुलविणाऱ्या व्यक्तीच्या समोर समस्या आ वासून उभ्या असतात. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असले, तरी समस्या मात्र आपली पाठ सोडत नाहीत. ज्याप्रमाणे आपली सावली पाठ सोडत नाही अगदी त्याचप्रमाणे समस्या जीवन जगताना भेडसावत असतात. समस्या अनेक असतात.

जिथे जिथे समस्या उद्‍भवतात तिथेच समस्येचे समाधान, उपाय असतात पण आपण समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न न करता भीतीचे काहूर मनात निर्माण करतो. मनाने हरलेला मनुष्य कितीही धडधाकट असला, तरी खचलेला दिसतो. म्हणून मन खंबीर ठेवून समस्येला डोक्यावर न घेता डोकं लावून सोडविण्याचा प्रयत्न करायला हवे. समस्या प्रत्येकालाच असतात. त्याचे भांडवल न करता सोडविण्याची क्लृप्ती, युक्ती, वृत्ती बदलायला हवी.

जगाचा पोशिंदा असलेला बळीराजाला असंख्य समस्या असतात. एखादे वर्षी शेतात उत्पादन कमी झाले म्हणून शेती करणे सोडून देत नाही. ‘झाली तर शेती नाहीतर माती’ असं माहीत असून देखील मनातून न खचता नव्याने उभारी घेऊ पाहतो. शेतकऱ्याला नांगरणी, वखरणी, बी-बियाणे, खते, शेतमजूर यांची नेहमीच वानवा असते. तरीदेखील मन घट्ट ठेवून दरवर्षी तो हा जुगार खेळतच असतो. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीत सिंचनाची सोय नाही, पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते.

Indian Agriculture
Agriculture Drone : ड्रोनसाठी मल्टिस्पेक्ट्रल, हायपरस्पेक्ट्रल सेन्सर

कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाने बळीराजा होरपळून निघत असतो. परंतु जिद्द, चिकाटी, ध्येय न सोडता तो अविरत शेतीत घाम गाळत असतो. शेतीत येणाऱ्या प्रत्येक समस्येला तोंड देत, परिस्थितीशी झगडत तटस्थपणे उभा असतो. या वर्षी शेतीमध्ये झालेली अपरिमित हानी म्हणजे निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस, पूरजन्य परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या वाटेत काटेच पेरले आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

तरी देखील काट्यांतून नवीन वाटा निर्माण करण्याची जिद्द बळीराजाकडून शिकायला हवं. शासनाने शेतीसाठी बऱ्याच योजना आणल्या असल्या तरी त्या तोकड्या आहेत. शेतीसाठी राबविणाऱ्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने व पारंपरिक पद्धतीने शेती करावी लागत असल्याने खूप समस्या दिसत आहेत. या समस्यांचे बळीराजा भांडवल न करता निमूटपणे आपला शेतीचा व्यवसाय उदरनिर्वाह करण्यासाठी चालवत असतो हे प्रकर्षाने सांगावे वाटते.

Indian Agriculture
Agriculture Electricity : चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात शेतीला मिळणार दिवसा वीज

आपल्या भारत देशात लोकसंख्या भरमसाट वाढलेली आहे. १३० कोटी जनतेच्या देशात प्रचंड बेरोजगारी आहे. रोजगार मिळविण्याच्या हेतूने तरुण-तरुणी शहराकडे धाव घेत असल्याची चित्र दिसून येते. शेती व्यवसायात हंगामी रोजगार मिळतो त्यानंतर मात्र रिकामं राहावं लागते. त्यामुळे आपला संसाररथ चालविण्यासाठी रोजगार मिळविणे क्रमप्राप्त आहे. औद्योगिक नगरीत धोक्याच्या ठिकाणी काम करणारे मजूर आणि त्यांच्या समस्यादेखील अनंत आहेत.

मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना या जागतिक महामारीने डोकं वर काढले आणि कित्येक जण हे जग सोडून निघून गेले तरी शहरीकरणाकडे मजुरांचा ओढा कमी झालेला दिसून येत नाही. कामगारांना/मजुरांना कारखान्यात कधी मालकांकडून तर कधी वरिष्ठांकडून जादा तास काम करवून घेतले जाते. वेळेवर पगार, बोनस दिल्या जात नाही. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी संघटनात्मक लढा देण्यास व न्याय्यहक्क मिळविण्यासाठी कामगार संघटनादेखील आग्रही आहेत. म्हणून असलेल्या काट्याला वाटेतून तोडण्यासाठी कामगाराने सतर्क राहण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे समस्येची साखळी तोडून नवीन वाटा शोधायला हवे.

Indian Agriculture
Agriculture Electricity : शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे रहस्य

जग खूप सुंदर आहे. या जगात जगताना नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. प्राचीन काळात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू समजली जायची. ‘चूल आणि मूल’ एवढ्यावरच तिला बंदिस्त ठेवल्या जात होते. त्यांना बाहेर पडता येत नव्हते. शिक्षणाची तर दारेच बंद होती. या प्रथेला छेद देत सावित्रीमाईने शिक्षणक्रांती घडविली. त्यापूर्वी अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, फातिमा शेख, रमाई यांसारख्या अनेक महिलांनी वाईट प्रथा, परंपरेचा प्रखर विरोध करून असलेल्या समस्या सोडविल्या. आज भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य स्वीकारले असले तरी आजही स्त्री बंधनातून मुक्त झालेली दिसून येत नाही.

अंतराळात झेप घेणाऱ्या स्त्रीला देखील विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाईट नजरा, विनयभंग, लैंगिक अत्याचार, बलात्कार, छळ, ॲसिड हल्ला यांसारखे कृत्य समाजात घडून येत आहेत. म्हणजेच स्त्रियांच्या समस्यादेखील अजूनही सुटलेल्या नाहीत. समाजात जीवन जगत असताना क्षणोक्षणी महिलांची होणारी गळचेपी ही लाजिरवाणी बाब असली तरी मनाने खंबीर असलेल्या स्त्रियांनी या समस्येचे भांडवल केले नाही. स्त्री ही अबला नसून सबला आहे हे त्यांच्या मनावर कोरलेले आहे. या समस्येचे डोंगर बाजूला सारून घरातील व घराबाहेरील कार्य समाधानाने करीत असल्याचे दिसून येते. हे केवळ त्यांना येणाऱ्या समस्यांना ते खंबीरतेने तोंड देत असल्यामुळे शक्य होतेय.

लोकशाही अस्तित्वात असलेल्या प्रत्येक देशातील कर्मचारी हा देशाच्या विकासाचा कणा समजला जातो. देशाची/राज्याची धोरणे प्रत्यक्ष राबविण्याची कार्य कर्मचारी करीत असतो. कर्मचारी आपल्या वयाची ३० ते ३५ वर्षे सेवा केल्यानंतर म्हातारपणात शासनाने पेंशन देणे गरजेचे आहे पण १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनपासून वंचित ठेवले गेले आहे. म्हणून कर्मचाऱ्यात पेंशन धारक व पेन्शनविहिन कर्मचारी असा भेद निर्माण केला गेला आहे.

नव्या कर्मचाऱ्यांना सेवेत असताना वेतन मिळते म्हणून जगणे सहजशक्य होईल पण सेवा निवृत्तीनंतर पेंशन नसल्याने जगणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे ही समस्या सर्वांसाठी असल्याने पुढील काळात सेवेत येणाऱ्या सर्वांना पेन्शनला मुकावे लागणार आहे म्हणून सर्व कर्मचारी, संघटना, सामाजिक संघटना एकत्र येऊन चळवळ उभी व्हायला हवी. आपला हक्क म्हणजे जुनी पेंशन मिळवण्यासाठी यावर सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे. समस्या आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा लढत राहणे हे कधीही सोईस्कर व उचित राहते. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समस्या उद्‍भवत असतात. म्हणून समस्येला गोंजारत बसू नका तर समस्या कशी सोडवायची? आणि कशी सुटेल? यासाठी विचारमंथन करून पुढील मार्ग ठरवायला हवा. अडचणींचे काटे आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्यावर मात करणाऱ्या अनंत वाटा असतात. त्या शोधण्याचे कौशल्य प्रत्येकाने निर्माण केल्यास अडचणीची वाट सुकर झाल्याशिवाय राहणार नाही.

(लेखक शिक्षक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com