मिश्राची रवानगी पुन्हा तुरुंगात ? 

आव्हानयाचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी करताना प्रशांत भूषण यांनी या हिंसाचार प्रकरणातील इतर आरोपीही जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच जामिनासाठी धडपडणाऱ्या आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाला देण्यात यावेत, अशी विनंतीही भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) केली.
SC to hear appeal against Ashish Mishra
SC to hear appeal against Ashish Mishra

 लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील सूत्रधार आशिष मिश्राच्या (Ashish Mishra ) जामिनाला दिलेल्या आव्हानयाचिकेवर येत्या ११ मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे आज सर्वोच्च न्यायालयाने  (Supreme Court ) स्पष्ट केलाय.  येत्या ११ मार्च रोजीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मिश्राचा जामीन रद्द केल्यास मिश्राला पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे. 

लखीमपूर खेरी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी मिश्रा याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात  (Supreme Court) आव्हान दिले आहे. ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी या कुटुंबीयांतर्फे ही आव्हानयाचिका दाखल करत मिश्राचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी ( दिनांक ४ मार्च ) सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या खंडपीठाने येत्या ११ मार्च २०२२ रोजी याबाबत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  

आव्हानयाचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी करताना प्रशांत भूषण यांनी या हिंसाचार प्रकरणातील इतर आरोपीही जामिनासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच जामिनासाठी धडपडणाऱ्या आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाला देण्यात यावेत, अशी विनंतीही भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे  (Supreme Court) केली. त्यावर सरन्यायाधीश रमण यांनी तुम्ही तसा अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे करा, अशी सूचना केली.   

व्हिडीओ पहा- 

गेल्या वर्षी ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात ८ लोकांचा मृत्यू झाला होता. यात आशिष मिश्राने आंदोलनकर्त्यांच्या अंगावर एसयूव्हीही चालवली होती. ज्यात ४ शेतकरी मृत्युमुखी पडले होते. तर त्यांनतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी ४ लोकांचा मृत्यू झाला होता. 

उत्तर प्रदेश सरकराने नियुक्त विशेष तपास पथकाच्या अहवालानुसार लखीमपूर खेरी हिंसाचार हे सुनियोजित षडयंत्र असून आशिष मिश्रा हा या षडयंत्राचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आशिष मिश्राविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र १० फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्चा न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने मिश्राची जामिनावर सुटका केली होती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com