PM Kisan : एक कोटी ३ लाख रुपये आयकरदात्यांकडून वसूल

गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील ५ हजार ४१५ शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे वसूल केले जात आहेत. आतापर्यंत १ हजार १६४ जणांनी १ कोटी ३ लाख ५६ हजार रुपये परत केले आहेत.
PM Kisan Scheme
PM Kisan Scheme Agrowon

रत्नागिरी : पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत. मात्र या योजनेचा (PM Kisan Benefit) लाभ काही आयकर दाते तसेच शासकीय कर्मचारी (Government Employee) घेत असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील ५ हजार ४१५ शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे वसूल केले जात आहेत. आतापर्यंत १ हजार १६४ जणांनी १ कोटी ३ लाख ५६ हजार रुपये परत केले आहेत.

जिल्ह्यात या योजनेचे २ लाख ६९ हजार ८३ लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी आयकर दाते असलेले शेतकरी आणि शासकीय कर्मचारी घेत असल्याचे निदर्शनात आले.

त्यांच्याकडून घेतलेल्या निधीची रक्कम भरून घेण्याची कारवाई सुरू आहे. यापैकी आयकर दाते असलेल्या ४ हजार ८८४ लाभार्थ्यांकडून आतापर्यंत २६,००३ हप्ते मिळाले आहेत. तर अन्य अपात्रांकडून येणे बाकी आहे.

जिल्ह्यात २ लाख ५ हजार १४८ लाभार्थींपैकी आयकर दात्यांसह अपात्र ठरलेल्या ५ हजार ४१४ पैकी ४ हजार ८८२ जणांकडून वसुली झाली आहे.

वसुलीसाठी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांकडून वारंवार नोटीस पाठविल्या जात आहेत. अपात्र ठरलेल्या काही लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वसुलीत अडचणी येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थी स्थिती

तालुका - लाभार्थी संख्या - अपात्र

मंडणगड - ७०२२ २२३

दापोली - २६३३२ ७३१

खेड - १६३३१ ६१७

गुहागर - २४१५१ ६९७

PM Kisan Scheme
PM Kisan : ७३ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अडकली

चिपळूण - १६०२३ - ४६४

संगमेश्वर - ३३५५० - ७११

रत्नागिरी - ४३,६७८ १००८

लांजा - २१३७५ ५३४

राजापूर- १७६८६ ४३०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com