
Akola News : शासनाच्या मृद् व जलसंधारण विभागाच्या (Department of Water Conservation) निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियानाचा (Jalyukta Shivar Abhiyan) दुसरा टप्पा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी समितीद्वारे निकषानुसार पात्र गावांची निवड करण्यात आली असून, निवडलेल्या १३१ गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यताही दिली आहे.
निवड केलेल्या गावांचा अंतिम आराखडा करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा (Nima Arora) यांनी संबंधितांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान अंमलबजावणी संदर्भात झालेल्या बैठकीला उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गिते, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एन. बी. इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मुरली इंगळे यांच्यासह सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अरोरा यांनी गाव आराखडा शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणेच तयार करावा. मृद् व जलसंधारणाच्या कामात खासगी, अशासकीय संस्था तसेच लोकसहभाग घ्यावा.
तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांचे सूक्ष्म नियोजन करून अंतिम आराखडा तयार करावा, असेही निर्देश या वेळी दिले.
या गावांची झाली निवड
बार्शीटाकळी तालुका (१९ गावे) : सारकिन्ही, चेलका, बोरमळी, निंबी, जामवसू, रुस्तमाबाद, सेवानगर, धाबा, मांडोली, शेलगाव, कान्हेरी (सरप), कासारखेड, चिंचखेड, पाराभवानी, मोऱ्हळ, घोटा, धारागिरी, सावरखेड, धाकली
अकोला (१७ गावे) : कापशीरोड, बोंदरखेड, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, आगर, माझोड, चिखलगाव, गोरेगाव बुद्रुक, निंबी मालोकर, देवळी, टाकळी पोटे, जवळा खुर्द., घोंगा, सोनाळा, बोरगाव मंजू, येळवण
मूर्तिजापूर (२७ गावे) : पिंपळशेंडा, मोहखेड, आरखेड, लोधीपूर, बाळापूर, हमीदपूर, अलादपूर, गोपाळपूर, मिरापूर, किनखेड, शिवण खुर्द, रामखेड, बहादरपूर, गोरेगाव, सलतवाडा, कादवी, कासवी, चिखली, भगोरा, धानोरा वैद्य, अनभोरा, सोनोरी, किन्ही, शेणी, फणी, जितापूर नाकट, खरबढोरे
अकोट (२३गावे) : अकोलखेड, आलेगाव, अंबोडा, बोचरा, खुदवंतपूर, शहापूर प्र. अकोट, शहापूर प्र.कार्ला, शेरी बुद्रुक, वडाळी देशमुख, वाघोडा, वणी, वासाळी नागापूर, नर्व्हरी खुर्द, औरंगाबाद प्र. अकोट, अमिनापूर, चिंचखेड खुर्द, धामणगाव, लोहारी खुर्द, लोहारी बुद्रुक, बोर्डी, उमरा, चिंचखेड बुद्रुक, दहीखेल फुटकळ
तेल्हारा (२४ गावे) : चांगलवाडी, दानापूर, हयातपूर, हिंगणा खुर्द, इसापूर, जाफ्रापूर, माळेगाव बाजार, माळेगाव प्र. अडगाव, शेरी खुर्द, शेरी,वडनेर, वारी आदमपूर, वारी भैरवगड, कोठा, शिवाजीनगर, खंडाळा, मोराडी, दिवानझरी, चिचारी, चंदनपूर, भिली, बोरव्हा, चिपी, सदरपूर, चित्तलवाडी
बाळापूर (८ गावे) : सांगवी जोमदेव, बटवाडी खु., बटवाडी बु., मांडवा खु., पिंपळगाव, तांदळीतर्फे तुलंगा, चिंचोली गणु, तामसी
पातूर (१३ गावे) : खापरखेडा, दिग्रस खुर्द, पातूर जिरायत भाग-२, पातूर जिरायत भाग-३, हिंगणा (उजाडे), गोळेगाव, जांब, पाचरण, चिचखेड-पिंपळखुटा, पिंपळडोळी, चोंढी, वरणगाव, डोलारखेड.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.