Farmer Subsidy
Farmer SubsidyAgrowon

Irrigation Subsidy : दीड हजारावर शेतकऱ्यांना मिळाला अनुदानाचा लाभ

कृषी सिंचन योजनेअंतर्गत तुषार आणि ठिबक सिंचन संचाच्या खरेदीसाठी लाभार्थीं सिमांत शेतकऱ्यांना ५५ टक्के, तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते.

परभणी ः जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Irrigation Scheme) २०२२-२३ या वर्षासाठी सूक्ष्म सिंचन (Micro Irrigation) घटक (ठिबक आणि तुषार संच) अनुदानासाठी (Irrigation Subsidy) २ हजार ३२५ शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

जानेवारीअखेर त्यापैकी १ हजार ५३३ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख ६५ हजार १७५ रुपये अनुदान वितरित करण्यात आले अशी माहिती कृषी विभागाच्या (Agricultural Department) सूत्रांनी दिली.

कृषी सिंचन योजनेअंतर्गत (Agricultural Irrigation Scheme) तुषार आणि ठिबक सिंचन संचाच्या खरेदीसाठी लाभार्थीं सिमांत शेतकऱ्यांना ५५ टक्के, तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते.

या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील २१ हजार ८६७ प्रस्ताव दाखल केले होते. त्यात परभणी तालुक्यातील ३ हजार ६६३ प्रस्ताव, जिंतूर तालुक्यातील ४ हजार २४९ प्रस्ताव, सेलू तालुक्यातील २ हजार ९८४ प्रस्ताव, मानवत तालुक्यातील २ हजार ५४०, पाथरी तालुक्यातील १ हजार ८७० प्रस्ताव, सोनपेठ तालुक्यातील ६५६ प्रस्ताव, गंगाखेड तालुक्यातील १ हजार ४६४ प्रस्ताव, पालम तालुक्यातील १ हजार ९६९ प्रस्ताव, पूर्णा तालुक्यातील २ हजार ३७२ प्रस्तावांचा समावेश आहे. त्यापैकी ७६१ प्रस्ताव नाकारण्यात आले.

तर १० हजार ३६६ प्रस्ताव रद्द करण्यात आले. एकूण १० हजार ७४० प्रस्ताव अनुदानाच्या प्रक्रियेत आहेत. सर्व तालुक्यातील ६ हजार ६४७ शेतकऱ्यांचे कागदपत्रे अपलोड झाली असून अद्याप ४ हजार ९३ शेतकऱ्यांचे कागदपत्रांचे अपलोड करणे बाकी आहे.

तालुकास्तरीय छाननी, मोका तपासणी, देयकांच्या पडताळणी, मोजमाप पुस्तकेतील नोंदीनंतर एकूण २ हजार ३२५ प्रस्तावांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात मंजुरी देण्यात आली.

Farmer Subsidy
Union Budget 2023 : शेतीवर शब्दसुमनांचे सिंचन

त्यात परभणी तालुक्यातील १८५ प्रस्ताव, जिंतूरमधील ४५९ प्रस्ताव, सेलू तालुक्यातील ४६१ प्रस्ताव, मानवतमधील २९६, पाथरीमधील १९७ प्रस्ताव, सोनपेठ तालुक्यातील ८४ गंगाखेड तालुक्यातील २०७ प्रस्ताव, पालममधील ३१३, पूर्णा तालुक्यातील १२३ प्रस्तावांचा समावेश आहे.

बँक खात्याला आधार क्रमांक संलग्न नसणे, चुकीचा आयएफएससी कोड आदी कारणांमुळे ९८ शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे.

सर्व नऊ तालुक्यांतील १ हजार ५३३ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख ६५ हजार १७५ रुपये एवढे अनुदान वितरित करण्यात आले असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com