जालन्यात खरीप पीककर्ज मागणीसाठी १५,०४२ ऑनलाइन अर्ज

जालना खरीप पीक कर्ज मागणीसाठी १० जूनपर्यंत १५ हजार ४२ अर्ज आले आहेत. शिवाय पीककर्ज मागणी नोंदणीसाठी मंगळवारपासून (ता. १४) नवीन सॉफ्टवेअर आणले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
जालन्यात खरीप पीककर्ज मागणीसाठी १५,०४२ ऑनलाइन अर्ज
Crop LoanAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
औरंगाबाद : जालना (Jalna) खरीप पीक (Khrip Crop) कर्ज मागणीसाठी १० जूनपर्यंत १५ हजार ४२ अर्ज आले आहेत. शिवाय पीककर्ज (Crop Loan) मागणी नोंदणीसाठी मंगळवारपासून (ता. १४) नवीन सॉफ्टवेअर आणले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड (Vijay Rathod) यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना कर्ज मागणी व पुरवठा गतीने होण्यासाठी प्रशासनाचे हे प्रयत्न असल्याचे मानले जाते.

खरीप हंगाम २०२२-२३ करिता जालना जिल्ह्यामध्ये बँकांतर्फे पीककर्ज वाटप सुरू आहे. पीककर्ज वाटपासाठी होणाऱ्या गर्दीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पीककर्जासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी गुगल लिंकवरील ऑनलाइन अर्ज भरून पीक कर्ज मागणी नोंदणी करण्यात येत होती.

या लिंकवर १० जून २०२२ रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत एकूण १५,०४२ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. कर्ज मागणीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांचेमार्फत संबंधित बँक शाखांकडे पाठविण्यात आल्या आहेत. यासोबतच मंगळवारपासून (ता. १४) पीककर्ज मागणी नोंदणीसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.

सॉफ्टवेअरची लिंक jalna.cropsloan.com या प्रमाणे आहे. नविन सॉफ्टवेअरमध्ये आधी कर्ज मागणीसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या १५,०४२ लाभार्थ्यांना नव्याने नावनोंदणी करण्याची आवश्यकता नाही. शिवाय कर्ज मागणीसाठीची लिंक jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या लिंकद्वारे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सॉफ्टवेअरमधून थेट संबंधित बँकेकडे कार्यवाहीसाठी उपलब्ध होणार आहेत. सॉफ्टवेअरमध्ये ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर ७ दिवसाचे आत शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेस आवश्यक कागदपत्रांसह भेट देणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी कळविले आहे.

नवीन सॉफ्टवेअरचे फायदे
जालना जिल्ह्यात १४ जूनपासून पीककर्ज मागणी नोंदविण्यासाठी कार्यान्वित केलेले सॉफ्टवेअर संबंधित बँक शाखा व्यवस्थापक, अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी आदींच्या नियंत्रणाखाली असेल. किती अर्ज आले, आठवडा, पंधरवड्यात, महिन्यात किती निकाली निघाले याचा शाखानिहाय आढावा यंत्रणेला घेता येणार आहे. शिवाय अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यालाही त्यांच्या अर्जाची सद्यःस्थिती ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पाहता येणार आहे ही सोय आधी नव्हती. नव्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती रूपात नाव, आधार नंबर, बचत खाते नंबर, कर्ज कोणत्या बँक शाखेतून घ्यायचे, जमीन किती, गट नंबर व पीक कोणती घेणार याविषयी फक्त माहिती भरावी करावी लागणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com