Fruit Crop Insurance : फळबागांच्या विमाहप्त्यापोटी शेतकऱ्यांनी भरले १९६ कोटी

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतील अंबिया बहरात राज्यातील अडीच लाख फळबागाईतदार शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे.
Horticulture Scheme
Horticulture SchemeAgrowon

Crop Insurance News पुणे ः पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेतील (Fruit Crop Insurance)अंबिया बहरात राज्यातील अडीच लाख फळबागाईतदार (Horticulture Farmer) शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे. त्यासाठी विमा कंपन्यांकडे (Insurance Company) १९६ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. फळबागांचा विमा उतरविण्यात जळगाव, जालना, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

अंबिया बहरातील विम्याचे कंत्राट यंदा रिलायन्स, एचडीएफसी इर्गो आणि एआयसी (भारतीय कृषी विमा कंपनी) या कंपन्यांना मिळाले आहे.

यात ‘रिलायन्स’कडे ९०४८२ शेतकऱ्यांनी ५२०४६ हेक्टर बागांसाठी ५० कोटी २२ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला आहे.

याशिवाय केंद्र व राज्य शासन मिळून विमा हप्ता अनुदानापोटी 'रिलायन्स'कडे एकूण २२८ कोटी १३ लाख रुपये जमा होणार आहेत.

Horticulture Scheme
Fruit Crop Insurance : फळ पीकविमाप्रश्नी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

'एचडीएफसी'कडे ५२२७३ हेक्टरवरील फळबागांचा विमा उतरविला गेला आहे. त्यासाठी ६९५०४ शेतकऱ्यांनी ४८ कोटी ३० लाख रुपयांचा विमा हप्ता भरला आहे.

सरकारी अनुदानाचा हप्ता मिळून एकूण २३६ कोटी १२ लाख रुपये यंदा ‘एचडीएफसी’ने जमा केले आहेत.

अंबिया बहरात सर्वाधिक विमा हप्ता ‘एआयसी’ला मिळाला आहे. ही रक्कम ५०० कोटी ६३ लाख रुपयांच्या आसपास आहे.

‘एआयसी’कडे ८८६३० शेतकऱ्यांनी स्वतःचे ९७ कोटी ९१ लाख रुपये भरले आहेत. राज्याने २४९ कोटी ९५ लाख रुपये, तर केंद्राच्या १५२ कोटी ७६ लाख रुपये अनुदान हप्ता म्हणून या ‘एआयसी’ला दिले आहेत.

Horticulture Scheme
Fruit Crop Insurance : रावेरात फळ पीकविमा परताव्यापासून शेतकरी वंचित

राज्यात फळबागांचा विमा उतरविण्यात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. तेथील ७८४२९ शेतकऱ्यांनी ८२१५२ हेक्टरवरील केळीसह इतर फळबागांच्या विम्यापोटी यंदा ८६ कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले आहेत.

त्याखालोखाल विमा उतरविण्यात जालन्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. जालन्यात ४७६८३ शेतकऱ्यांनी २९ कोटी ६९ लाख रुपयांचा विमा हप्ता भरून ३७८८४ हेक्टरवरील बागांचा विमा उतरवला आहे.

त्यानंतर सिंधुदुर्गमधील ३८३७२ शेतकऱ्यांनी १७६७४ हेक्टरवरील तर रत्नागिरीतील ३२३७३ शेतकऱ्यांनी १७८६८ हेक्टरवरील बागांचा विमा उतरवला आहे.

आंबिया बहर फळपिक विमा स्थिती

> सहभागी शेतकरी ः २ लाख ४८ हजार ६१६

> विमा संरक्षित बागा ः १ लाख ९२ हजार १०३ हेक्टर

> शेतकऱ्यांनी भरलेला एकूण विमा हप्ता ः .१९६ कोटी रुपये

> राज्य शासनाने भरलेले विमा हप्ता अनुदान ः ४६७ कोटी रुपये

> केंद्र शासन भरलेले विमा हप्ता अनुदान ः ३०१ कोटी रुपये

> विमा कंपन्यांकडून गोळा एकूण विमा हप्ता रक्कम ः ९६५ कोटी रुपये

> विमा उतरविण्यात आघाडीवरील जिल्हे ः जळगाव, जालना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी

> सर्वात कमी विमा हप्ता भरणारा जिल्हा ः वाशीम (अवघा ७ हेक्टर)

> सर्वाधिक विमा संरक्षित तीन फळपिके ः केळी ८९५५२ हेक्टर, आंबा ३८३११ हेक्टर, डाळिंब ३३३३४ हेक्टर

तालुकानिहाय केळी लागवड

१) करमाळा ः ६९७८ हेक्टर

२) माळशिरस ः ३७७६ हेक्टर

३) पंढरपूर ः २७५६ हेक्टर

४) माढा ः १२७१ हेक्टर

५) मोहोळ ः ६८५ हेक्टर

६) सांगोला ः १४१ हेक्टर

७) बार्शी ः ७८ हेक्टर

८) अक्कलकोट ः ४३ हेक्टर

९) उत्तर सोलापूर ः २५ हेक्टर

१०) दक्षिण सोलापूर ः १३.४० हेक्टर

११) मंगळवेढा ः ५ हेक्टर

एकूण ः १५ हजार ७७७.४० हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com