Crop Damage Compensation : मूल तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मिळणार २२ कोटींची भरपाई

प्रशासनाकडून सर्वेक्षण व पंचनामे करण्यात आले. आता लवकरच मदतीचे वितरण होणार आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

चंद्रपूर ः संततधार पावसामुळे (Heavy Rainfall) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे (Crop Damage) नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाकडून सर्वेक्षण व पंचनामे (Crop Damage Survey) करण्यात आले. आता लवकरच मदतीचे वितरण होणार आहे.

Crop Insurance
Crop Damage : खानदेशात वादळी पावसाने नुकसान

नोव्हेंबर २०२१, जानेवारी २०२२ तसेच जुलै व ऑगस्ट २०२२ याप्रमाणे तीन वेळा जिल्ह्यात पाऊस, वादळीवाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून प्रत्येकवेळी झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्यात आले.

Crop Insurance
BSKKV Crop Advisory : कोकण सल्ला

त्याआधारे मदत निधीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात भरपाई मात्र मिळाली नव्हती. मूल तालुका प्रशासनाने ३५ हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी २२ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती.

Crop Insurance
Crop Insurance : संत्रा पिकासाठी विमा योजना

त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्‍कम जमा केली जाणार आहे. यात विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांना तीनही वेळा झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळणार आहे.

मूल तालुक्‍यात लागवडीखालील क्षेत्र २६,२८८.१४ हेक्‍टर असून २२,७८८ हेक्‍टर आर. क्षेत्रावर धानाची लागवड केली जाते. गेल्या काही वर्षात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे शेतीक्षेत्र सर्वाधीक प्रभावित झाले आहे.

असे आहे बाधित क्षेत्र... नोव्हेंबर २०२१ मधील ६४७१ हेक्‍टर व शेतकरी संख्या ६ हजार ८४४ इतकी आहे. यासाठी ४ कोटी ४० लाख रुपये मिळणार आहेत. जानेवारी २०२२ मध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या २२८१ असून नुकसानग्रस्त क्षेत्र ९०६ हेक्‍टर आहे.

यासाठी १ कोटी प्राप्त झाले आहेत. जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये २५ हजार ८९० शेतकऱ्यांचे १२ हजार ७९५ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी १७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com