३० शेतकरी कंपन्यांना २३० कोटींचे प्रकल्प मंजूर

'मॅग्नेट'अंतर्गत पहिल्या टप्प्यात ७२ कोटींचे अनुदान प्रस्तावित
Horticulture
HorticultureAgrowon

पुणे ः राज्यातील फलोत्पादनामध्ये मूल्यसाखळी (Horticulture Value Chain) विकसित करण्यासाठी जागतिक बॅंकेतर्फे महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (Maharashtra Agri Business Network) (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ३० शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (Farmer Producer Company) २३० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. तर ७२ कोटींचे अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘मॅग्नेट’चे प्रकल्प संचालक दीपक शिंदे यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

‘‘राज्यातील शेती उत्पादनांचे काढणीपश्‍चात नुकसान टाळण्यासाठी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी विकसित केली जात आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासूनच्या पहिल्या टप्यात राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून १६९ प्रस्ताव सादर झाले होते. यामध्ये १२४ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ४५ मूल्यसाखळी गुंतवणूकदारांचा समावेश होता. या प्रस्तावांची छाननी करून पात्र ३० संस्थांची निवड करण्यात आली. या संस्थांच्या २३० कोटींचे प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. यामधील ७२ कोटींच्या अनुदानास या संस्था पात्र झाल्या आहेत,’’ असे शिंदे यांनी सांगितले.

...अशी होणार मूल्यसाखळी विकसित

शेतीमालाच्या काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाअभावी मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी पॅकहाउस, प्रतवारी केंद्र, शीतगृह, रायपनिंग चेंबर, रेफर व्हॅन, फळे, भाजीपाला निर्जलीकरण तंत्रज्ञान, निर्यात सुविधा आदी.

या पिकांच्या मूल्यवर्धनासाठी ‘मॅग्नेट’

डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू. चिकू, भेंडी, मिरची (लाल आणि हिरवी) व फुले या ११ पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय पात्र संस्था

नाशिक - ४, नगर -३, सोलापूर -३, अमरावती -२, औरंगाबाद २, कोल्हापूर २, नांदेड २, सातारा २, पुणे १, सांगली १, बीड १, बुलडाणा १, उस्मानाबाद १ हिंगोली १, नंदूरबार १.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com