Farmer Accident Insurance Scheme : शेतकरी अपघात विमा योजनेतील लाभार्थी कुटुंबांना २९.९५ कोटी निधी मंजूर

राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येते. या योजनेतून राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते.
Gopinath Munde accident insurance
Gopinath Munde accident insuranceAgrowon

Farmer Scheme : शेतकरी अपघात विमा योजनेतून (Farmer Accident Insurance Scheme) अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना २९.९५ कोटी निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. लवकरच लाभार्थी कुटुंबियांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

तसेच ७ एप्रिल ते २२ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या कालावधीला खंडित कालावधी म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या कालावधीत प्राप्त १ हजार ५०८ प्रस्तावाला सरकारने मंजूरी दिली आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

Gopinath Munde accident insurance
Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’अंतर्गत २५ कोटींवर प्रोत्साहन अनुदान जमा

राज्यात गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात येते. या योजनेतून राज्यातील सर्व शेतकरी कुटुंबांना २ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात येते. त्यामध्ये शेतकरी, त्याची पत्नी, आई, मुलगा आणि अविवाहित मुलगी यांना ही मदत दिली जाते.

परंतु ही योजना राज्यात खासगी विमा कंपनीकडून राबवली जात होती. त्यामुळे अनेकदा विमा दावे निकाली काढण्यात दिरंगाई केली जायची. तसेच अनेक वेळा लाभ नाकाराला जायचा.

त्यामुळे राज्य सरकारने आता हे प्रस्ताव शासन नियुक्त समितीद्वारे तपासून मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी सहसंचालक तथा मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com