Crop Insurance : नांदेडला पीक विम्याचे ३१० कोटी जमा

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार २५ टक्के आगाऊ परतावा शेतकऱ्यांना देण्याची अधिसूचना जारी केली होती.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

नांदेड : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार २५ टक्के आगाऊ परतावा शेतकऱ्यांना देण्याची अधिसूचना जारी केली होती. यानुसार ३६८ कोटीपैकी ३१० विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर (Crop Damage Compensation) जमा केले आहेत. उर्वरित रक्कमही शासनाचा हिस्सा प्राप्त होताच जमा होईल, अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्राने दिली.

Crop Insurance
Crop Insurance : रब्बी हंगामासाठी कोणत्या पिकांचा विमा काढू शकता ? | ॲग्रोवन

नांदेड जिल्ह्यात सततचा पाऊस तसेच अनेक मंडळांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, खरीप ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती २५ टक्के अग्रिम देण्याची अधिसूचना लागू केली होती.

Crop Insurance
Crop Insurance : रब्बीसाठी पीकविमा योजना लागू

या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्वच ९३ महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यात येते. त्याअनुषंगाने विद्यमान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसारवर चार पिकांसाठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य करून ३६८ कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मंजूर केली.

यातील ३१० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कमही केंद्र व राज्य शासनाचा हप्ता जमा झाल्यानंतर खात्यावर जमा होईल, अशी माहिती मिळाली.

नुकसानीच्या दाव्याबाबत आकडेमोड सुरू

जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर ७२ तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात साडेचार लाखांपेक्षा अधिक दावे जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. प्राप्त दाव्याचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे.

याबाबत देण्यात येणाऱ्या परताव्या संदर्भात युनायटेड इंडिया इन्शुरन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यासमवेत बैठका होत आहेत. यातील आकडेमोडीनंतर रक्कम अंतिम होणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com