Farmer Incentive Subsidy : कोल्हापुरात १ लाखावर शेतकऱ्यांना ४०९ कोटींचा ‘लाभ’

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पीककर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाबाबतची जिल्ह्याची पहिली पात्र शेतकऱ्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह पोर्टलवर उपलब्ध झाली आहे.
Farmer Subsidy
Farmer SubsidyAgrowon

कोल्हापूर : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Farmer Loan Waive Scheme) नियमित कर्जफेड (Loan Repayment) करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम (Farmer Incentive Subsidy) जमा करण्याचा प्रारंभ अपर जिल्हाधिकारी किशेार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४०९ कोटी ५७ लाख रुपये जमा झाले आहेत.

Farmer Subsidy
Farmer Incentive Subsidy : सांगलीत शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील पात्र ७१ लाभार्थ्यांचा या वेळी अपर जिल्हाधिकारी पवार तसेच सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) दिलीप छत्रीकर, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरणसिंह पाटील, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Farmer Subsidy
Farmer Incentive Subsidy : नियमित कर्ज फेडणाऱ्या सोळा हजारांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पीककर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाबाबतची जिल्ह्याची पहिली पात्र शेतकऱ्यांची यादी विशिष्ट क्रमांकासह पोर्टलवर उपलब्ध झाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या १ लाख २३ हजार ७०५ व राष्ट्रीय बँकेकडील ५ हजार ५५४ लाभार्थी अशा एकूण १ लाख २९ हजार २६२ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com