
Mulching Paper Scheme : काळानुरूप शेती पध्दतीमध्ये मोठे बदल होत आहेत. आधुनिकिकरण आणि नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आता उत्पादनवाढीसह शेती फायद्याची होत आहे. कमी पाऊसमान आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यावर मल्चिंग पेपर सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरू शकतो.
मल्चिंग पेपरचे फायदे
भाजीपाला, फळबागा तसेच वेगवेगळ्या पिकांसाठी अच्छादन म्हणून मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे शेतात तणांची वाढ होत नाही. त्यामुळे तण काढणीच्या खर्चात बचत होते. तसेच उनामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.
अलिकडच्या काळात या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर वाढत असल्याने मल्चिंग पेपरसाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत मल्चिंग पेपरसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
कसे आहे अनुदान
सर्वसाधारण क्षेत्रसाठी प्रति हेक्टरी मल्चिंग पेपर वापरासाठी ३२ हजार रुपये खर्च येतो. या अभियानांतर्गत खर्चाच्या ५० टक्के जास्तीत-जास्त म्हणजेच १६ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते.
यामध्ये शेतकरी वैयक्तिक लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते.
आवश्यक कागदपत्रे
शेतजमीनीचा सातबा
८ अ
आधार कार्डची छायांकीत प्रत
आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती व अनु. जमाती प्रवर्गाकरिता )
अर्ज कुठे करायचा
मल्चींग साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्जासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच योजनेविषयीच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.