Perni Yantra Yojana : पेरणी यंत्रासाठी ५० टक्के अनुदान ; अर्ज कुठे करायचा

Agriculture Government Scheme : अधिकाधिक शेतकऱ्यांनी शेती कामांसाठी यांत्रिकिकरणाचा वापर करावा, यासाठी महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकिकरण योजना राबवत आहे.
Agriculture Mechanization Scheme
Agriculture Mechanization SchemeAgrowon

Agriculture Mechanization Scheme : देशातील खरीप हंगाम काही दिवसांवर येवून ठेपला आहे. अशात आता शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या (Kharif Season) तयारीची लगबग सुरू झाली आहे.

मशागतीपासून ते पेरणीपर्यंच्या (Sowing) कामांसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. परंतु, दिवसेंदिवस शेती कामांसाठी मजुरांची टंचाई (Labor Shortage) भासत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यांत्रिकिकरणाकडे वळताना दिसत आहेत.

अधिकाधिक शेतकऱ्यांनी शेती कामांसाठी यांत्रिकिकरणाचा वापर करावा, यासाठी महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकिकरण योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदीसाठी अनुदान ही योजना राबवण्यात येत आहे.

पेरणी योजने अंतर्गत (Perni Yantra Yojana) शेतकऱ्यांना पेरणी यंत्र खरेदीसाठी ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र सरकार पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजना २०२२-२३ साठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये सर्व कृषी यंत्रांसाठी ५० ते ८० टक्के एवढे अनुदान दिले जाणार आहे.

Agriculture Mechanization Scheme
Government Agriculture Scheme : डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत ५१८ लाभार्थींना अनुदान

कृषी यांत्रिकिकरण योजनेमध्ये सर्व कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. यामध्ये ट्रॅक्टर, पॉवर टिलर तसेच ट्रॅक्टरचलित अवजारांसाठीही अनुदान देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून बीबीएफ यंत्र खरेदी करण्यासाठीही अनुदान दिले जाते.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेंतर्गत मूळ यंत्राच्या किंमतीतून ५० % दरात सूट मिळणार आहे.

Agriculture Mechanization Scheme
Agriculture Scheme : सहा योजनांतून मिळणार विविध घटकांचा लाभ

बीबीएफ यंत्राचे फायदे

  • या पेरणीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंबही करता येते.

  • बीबीएफ पद्धतीने निविष्ठा खर्चात (बियाणे, खते इ.) २० ते २५ टक्के बचत होते.

  • खत व बियाणे एकाच वेळी पेरल्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होतो.

  • उत्पादनामध्ये २५ ते ३० टक्के वाढ होते.

  • वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने पर्जन्यमान खंडाच्या कालावधीत सुद्धा पाण्याचा ताण तीव्रता कमी होते.

  • जास्त पर्जन्यमान झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते.

  • पिकास मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. पीक कीड रोगास बळी पडत नाही.

योजनेसाठी असा करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह ॉनलाईन अर्ज करावा लागणारा आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या www. MahaDBT.com संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com