Crop Insurance : तांत्रिक अडचणींमुळे सव्वापाच कोटींचा पीक विमा थकला

विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात आली. खरीप हंगाम २०२२ मध्ये १० लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरविला.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

नांदेड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) मागील खरिपात हंगामातील (Kharif Season) प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन डव्हर्सिटी) घटकानुसार शेतकऱ्यांना नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम म्हणजेच ३६७ कोटी रुपये विमा (Crop Insurance) मंजूर झाला.

यातील ८५ टक्क्यांनुसार ३१० कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील १३ हजार ७५७ शेतकऱ्यांचा पाच कोटी २८ लाखांचा विमा थकला आहे.

बँकांकडून माहिती प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर विमा (Vima)जमा होणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यामध्ये विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात आली. खरीप हंगाम २०२२ मध्ये १० लाख ५७ हजार शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार हेक्टर क्षेत्रावर पीक विमा उतरविला.

दरम्यान मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन डव्हर्सिटी) घटकातील तरतुदीनुसार अधिसूचना जाहीर केली.

यानुसार विमा कंपनीने शेतकऱ्यांना सोयाबीन, ख. ज्वार, कापूस व तूर पिकांसाठी नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ रक्कम ३६७ कोटी रुपये मंजूर केली.

त्यापैकी ३१० (८५ टक्के) कोटी रुपये विमाधारक सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. परंतु यातील अनेक शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

परंतु बँक खात्यातील तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील १३ हजार शेतकऱ्यांचा पाच कोटी २८ लाखांचा विमा थकला आहे. याबाबत विमा कंपनीकडून संबंधित बँकांना कळवून माहिती पाठविली आहे.

Crop Insurance
Insurance Company : विमा कंपनीविरुद्ध करणार पोलीस कारवाई

पेंडीग शेतकऱ्यांना आधार संलग्न खात्यावर शिल्लक रक्कम पडेल, यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्राने दिली.

उर्वरित पंधरा टक्क्यांनुसार अद्याप कंपनीकडे शेतकऱ्यांचे ५७ कोटी रुपये रक्कम सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनी शासनाकडून निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com