Crop Insurance : वर्धा जिल्ह्यात पिकविम्याचे सात कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात

खरीप पिकांच्या उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसान भरपाईसाठी वर्धा जिल्ह्याला १५ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील १३ हजार १७० शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

वर्धा : खरीप पिकांच्या उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसान भरपाईसाठी (Crop Damage Compensation) जिल्ह्याला १५ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील १३ हजार १७० शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानाची रक्कम (Crop Insurance) जमा करण्यात आली आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर मिळालेली रक्कम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा भरपाई देण्याची सुचना

पावसामुळे जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २६ हजार ८२५ शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा उतरविला. शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाले याबाबतची पूर्वसूचना आपल्या संबंधित विमा कंपनीला देणे आवश्यक होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांनी सहकार्य करीत माहिती कंपनीकडे सादर केली.

Crop Insurance
Crop insurance : प्रलंबित पीक नुकसानीची रक्कम तातडीने अदा करा

झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले, पीक पाहणी झाली. तसा अहवाल पीकविमा कंपनीकडे दिवाळीपूर्वी पाठविण्यात आला. पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीला जमा करण्यात येईल, असा विश्‍वास कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. मात्र दिवाळीनंतर जिल्ह्यातील १३ हजार १७० शेतकऱ्यांच्या खात्यात सात कोटी ३२ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला. आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

१४७ महसूल मंडळाला मदत

खरिपाच्या सोयाबीन, तूर, कापूस या पिकांसाठी जिल्ह्यातील १४७ मंडळांतील २६ हजार ८२५ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. पीकविमा उतरविलेले सर्वच शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहे. गत सात वर्षांच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई देण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे.

पीकनिहाय दिली जाणारी मदत

पीक शेतकरी मदत (रु.)

सोयाबीन १३,७८१ ७ कोटी ३९ लाख ७४ हजार

कापूस ९,८११ ७ कोटी ३४ लाख ७३ हजार

तूर ३,२३३ ६० लाख ३५ हजार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com