Crop Insurance : नांदेडमध्ये शेतकऱ्यांना ७० कोटींचा विमा मंजूर

प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजना २०२१ मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकानुसार शेतकऱ्यांना ४५९ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला होता. त्याचे वितरणही यापूर्वीच झाले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

नांदेड : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजना (Om Kharif Crop Insurance Scheme) २०२१ मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती ()Natural Calamity घटकानुसार शेतकऱ्यांना ४५९ कोटी रुपयांचा विमा (Crop Insurance) मंजूर झाला होता. त्याचे वितरणही यापूर्वीच झाले आहे. यानंतर पीक कापणी प्रयोगानुसार उत्पन्नावर आधारित घटकानुसार सहा पिकांसाठी ६९ कोटी ८३ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. यात सर्वाधीक सोयाबीनसाठी ५७ कोटी १३ लाख रुपये असल्याची माहिती कृषी विभागाच्या (Department Of Agriculture) सूत्राने दिली.

Crop Insurance
Crop Insurance : ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत इफ्को टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम २०२१ साठी नऊ लाख ११ हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामाच्या काळात प्रारंभी २२ दिवसाचा खंड पडला. यानंतर ऑगस्ट तसेच सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती उद्भवली. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे भरपाईबाबत पाच लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी दावे दाखल केले होते.

Crop Insurance
Soybean Rate : यंदा सोयाबीन उशीरा येणार ?

यानंतर विमा कंपनीने शॉपंल सर्वेच्या माध्यमातून ९ लाख ११ हजार २२८ शेतकऱ्यांना ४५९ कोटी २४ लाखांचा विमा परतावा मंजूर झाला होता. हा मंजूर विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरही जमा झाला आहे. यानंतर पीक कापणी प्रयोगानंतर येणाऱ्या उत्पादकतेवर आधारित विमा शिल्लक होता. हा विमा नुकताच मंजूर झाला आहे. यात सहा पिकांसाठी ६९ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. यात सर्वाधीक सोयाबिनसाठी ५७ कोटी १३ लाख रुपये तर तुरीसाठी सहा कोटी ९२ लाख, ज्वारीसाठी तीन कोटी पाच लाख, कपाशीसाठी एक कोटी ७७ लाख, उडदासाठी ८७ लाख व मुगासाठी सात लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. हा विमा संबंधित मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती सूत्राने दिली.

खरीप हंगाम २०२१ मधील

उत्पन्नावर आधारित मंजूर विमा

पीक मंजूर विमा

सोयाबीन ५७ कोटी १३ लाख

तूर सहा कोटी ९२ लाख

ज्वारी तीन कोटी पाच लाख

कपाशी एक कोटी ७७ लाख

उडीद ८७ लाख ६९ हजार

मुग सात लाख पाच हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com