Agriculture Scheme : जळकोट तालुक्यात विविध योजनेतील ७० विहिरी

बिरसा मुंडा योजनेत (अनुसूचित जमाती) २०२१-२२ मध्ये ५ विहिरी मंजूर आहेत.
Agriculture Scheme
Agriculture SchemeAgrowon

Latur News : शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असलेल्या शासनाच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना (Dr. Babasaheb Ambedkar Agricultural Scheme), राष्ट्रीय कृषी विकास योजना, बिरसा मुंडा या विविध योजनेतून गेल्या दोन वर्षात तालुक्यात ७० विहिरी (Well) मंजूर झाल्या.

ज्या विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत, त्या लाभार्थ्यांना आपल्या शेतात रब्बी पीक घेणे शक्य झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनेत (अनुसूचित जाती) २०२१-२२ मध्ये ५० विहिरी मंजूर असून २७ कडेबांधकाम पूर्ण व वापर सुरु आहे. १८ विहिरींचे खोदकाम पूर्ण तर उर्वरित कामे सुरु आहेत. २०२२-२३ मध्ये १७ मंजूर विहिरीपैकी ४ पूर्ण तर उर्वरित सुरु आहेत.

बिरसा मुंडा योजनेत (अनुसूचित जमाती) २०२१-२२ मध्ये ५ विहिरी मंजूर आहेत. यात दोन पूर्ण व ३ काम सुरु आहेत. तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २ मंजूर असून यावर्षी यात प्रस्ताव नसल्याची माहिती विस्तार अधिकारी व्यंकटराव धुळे यांनी दिली.

Agriculture Scheme
Maharudra Manganale: ही देखणी विहीर निळ्याशार पाण्यामुळे छोट्या समुद्रासारखी वाटते...

सर्वाधिक पाणी लागलेल्या विहिरीत वामन सूर्यवंशी (गुत्ती), कोंडिबा वाघमारे (डोमगाव), उद्धव सोनकांबळे, मारुती वाघमारे (ढोरसांगवी), मारुती तोलसरवाड (सोनवळा), संतोष गिर्दवाड (तिरुका), भागवत सूर्यवाड (वांजरवाडा) यांचा समावेश, असल्याचे श्री धुळे यांनी सांगितले.

मारुती वाघमारे यांनी ऊस लागवड केल्याचे सांगत गुत्ती, घोणसी, तिरुका, हाळदवाढवणा, चिंचोली, जगळपूर, मरसांगवी, बोरगाव, होकर्णा, केकतसिंदगी, हावरगा, डोमगाव, वांजरवाडा, सुल्लाळी, लाळी बुद्रूक, पाटोदा बुद्रूक आदी गावातील लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

Agriculture Scheme
Indian Agriculture : विहीर
योजनेतून विहीर घेतली तिला उन्हाळ्यात चांगले पाणी लागले. यावर्षी रब्बीत दहा एकर शेती सिंचनाखाली आणली. यात गहू, हरभरा, ज्वारी व भाजीपाला ही पिके घेतली आहेत.
भागवत मोहन सूर्यवाड, वांजरवाडा (ता.जळकोट)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com