Abjay Yojana : अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी ७४ हजारांवर ग्राहक पात्र

वीजबिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने सुरू केलेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेण्याची संधी ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे.
Abhay Yojana
Abhay Yojana Agrowon

धुळे ः वीजबिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित (Power Connection) असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या (Power Supply) पुनरुज्जीवनासाठी महावितरणने (Mahavitaran) सुरू केलेल्या विलासराव देशमुख अभय योजनेचा (Vilasrao Deshmukh Abhay Yojana) लाभ घेण्याची संधी ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहे. यात जिल्ह्यातील पात्र ७४ हजारांवर ग्राहक या संधीचा लाभ घेऊ शकतात. योजनेत घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी मिळून अर्थकारणाला गती मिळणार आहे.

Abhay Yojana
Abhay Yojana : वीज खंडित थकबाकीदारांना महावितरणचा दिलासा

योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे. योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ ला किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगरकृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेत पात्र होते.

Abhay Yojana
Abhay Yojna : ‘अभय’ योजनेला डिसेंबरपर्यंत वाढ

योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी (१ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत) होता. मात्र अनेक ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला. योजनेचा लाभ घेण्यासाठी अखेरचे तीन आठवडे राहिले आहेत.

अशी असेल प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी ३१ डिसेंबरपर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. थकबाकी एकरकमी भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांनी उच्चदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल.

हप्तेवारीने पैसे भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना पहिला हप्ता हा मूळ थकबाकीच्या ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या सात दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. उर्वरित रक्कम ठराविक हप्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे. ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर २०२२ ला किंवा त्यापूर्वी अर्ज मंजूर केले आहेत त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com