Drip Irrigation Scheme Subsidy : ठिंबक सिंचनासाठी मिळणार ८० टक्के अनुदान; अर्ज कुठे करायचा?

Drip Irrigation Maharashtra : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास प्रति थेंब अधिक पीक योजने अंतर्गत राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते.
Drip Irrigation Scheme Maharashtra
Drip Irrigation Scheme MaharashtraAgrowon

Maharashtra Government Scheme : राज्यात साधारण ८२ टक्के कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यामुळे या कोरडवाहू क्षेत्रावरील शेतीसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुढाकार घेत असते. राज्य सरकार सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देते.

जेणेकरून शेतकऱ्यांचं शेतात सिंचनची सोय उपलब्ध होईल. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास प्रति थेंब अधिक पीक योजने अंतर्गत राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते.

या योजनेतून ठिंबक सिंचनसाठी सरकार अनुदान देत असते. कृषी विभागाने या संदर्भात दिलेली माहिती जाणून घेऊया.

ठिंबक सिंचन योजना

राज्यातील कोरडवाहू जमीन जास्तीत जास्त पिकांखाली आणण्याचं सरकार धोरण आहे. त्यासाठी सिंचनाची गरज असते. त्यामुळे उपलब्ध पाणी आणि त्याचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना करता यावा, असा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे ठिंबक सिंचनचा वापर करून पाण्याची बचत तर होतेच पण पिकांना गरजेपुरते पाणी देऊन पाण्याचा योग्य प्रमाणात वापरही करता येतो.

पात्र लाभार्थी-

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन ठिंबक सिंचन योजनेसाठी राज्यातील सर्वच शेतकरी पात्र आहेत. परंतु अर्जदार शेतकऱ्याने मागील ७ वर्ष या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अशी अट राज्य सरकारने घातलेली आहे.

Drip Irrigation Scheme Maharashtra
Agriculture Irrigation: उन्हाळ्यातला पाऊस निसर्गाला बदलवतोय का?

कागद पत्र

ठिंबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे जमिनीचा सातबारा आणि ८अ उतारा असणे आवश्यक आहे. अनूसूचित जाती आणि अनूसूचित जमातीच्या लाभार्थींना योजनेचा लाभ घेण्यासाठी संवर्ग प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

अनुदान कसं मिळणार?

अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ८० टक्के आणि इतर शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ७५ टक्के अनुदान देण्यात येतं.

या योजनेसाठी केंद्र सरकार पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान देते. तर उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५ टक्के देण्यात येते.

अर्ज करा इथं

या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येतो. अर्ज करण्यासाठी mahadbtmahait.gov.in या वेबसाईटला जाऊन अर्ज करता येतो. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक संपर्क करू शकता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com