PM Kisan Scheme : वाळव्यात ८२ हजार शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान’चा लाभ

PM Kisan Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी तालुक्यातून ८२ हजार ३६८ लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. अशांना शासनाचे अनुदानही त्यांच्या खात्यात जमा होत आहे.
Pm Kisan Scheme
Pm Kisan SchemeAgrowon

PM Kisan Sangli News : पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी तालुक्यातून ८२ हजार ३६८ लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. अशांना शासनाचे अनुदानही त्यांच्या खात्यात जमा होत आहे.

परंतु यामधील माहिती न मिळालेले, अपात्र खातेदार २ हजार ६६० आहेत. अशा खातेदारांनी आपली कागदपत्रे संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत खातेदार शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहेत. ही योजना एक वर्ष पूर्ण झाल्यावर शासनाच्या लक्षात आले की, हे खातेदार शेतकरी आहेत;

परंतु शासनास दरवर्षी आयकर भरतात. या योजनेसाठी आयकर भरणारा शेतकरी अपात्र ठरत होता. त्याला याचा फायदा घेता येणार नाही, असे अध्यादेशात नमूद करण्यात आले होते.

Pm Kisan Scheme
PM Kisan : २० हजारांवर शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकीच

शिवाय तालुका पातळीवर तालठ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात काही शेतकऱ्याकडे शेतीच नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. तर काही कारणांनी शेती विकणे, आपापसातील अंतर्गत वादात जमीन हसतांतरीत केलेली निदर्शनास आलेली आहे.

त्यामुळे अशा लाभार्थ्यांची नोंद अपात्र ठरवण्यात आलेली आहे. गाव पातळीवर तलाठ्यांनी घरोघरी फिरून शेतीची नोंद घेतलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील काही लाभार्थ्यांचा शोधच लागत नसल्याने तलाठ्यांची मोठी कसरतच सुरू आहे.

अपात्र खातेदार म्हणजे आयकर भरणारे, शेतजमीन नावावर नसणारे खातेदार. राहिवाशी एका गावात व जमीन दुसऱ्या गावात असेल तर संबंधित तलाठ्यांना माहिती मिळत नसल्याने ते खातेदार अपात्र ठरत आहेत. अशा खातेदारांनी ७/१२ व ८ अ कागदपत्र घेऊन संबंधित गावच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांची माहिती नोंद केली जाईल.
प्रदीप उबाळे, तहसीलदार, वाळवा तालुका, तहसील कार्यालय, इस्लामपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com