Farmer Intensive Subsidy : शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी जमा

शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी ९३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती बॅंकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी दिली.
Crop Loan
Crop LoanAgriculture

नगर ः राज्य शासनाने महात्मा फुले योजने (Mahatma Phule Yojana) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २०१७-१८ आणि २०१८-१९, तसेच २०१९-२० या कालावधीत नियमित परतफेड केलेल्या शेतकरी सभासदांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी ९३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती बॅंकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे (Madhavrao Kanvade) यांनी दिली.

Crop Loan
Crop Insurance : नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत विमा कंपनीला पूर्वसूचना द्या

नगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांचा १ लाख ७७ हजार २६९ कर्ज खात्याची माहिती शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करून शासन पोर्टलवर अपलोड केलेली आहे. या माहितीचे शासनस्तरावर संगणकीय संस्करण होऊन पात्र शेतकरी सभासदांपैकी ३२ हजार ६०१ शेतकरी सभासदांची पहिली यादी शासन पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करण्याबाबत १२ आक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली असून, नगर जिल्ह्यातील ३१ हजार ९२० शेतकरी सभासदांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळालेले शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा सहकारी बँकेचे कर्जदार सभासद असून, बँकेचे शेती विकासासाठी जिल्ह्यात सिंहाचा वाटा आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ४१८ कर्जदार शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या त्यांच्या खाती रक्कम ९० कोटी ९३ लाख प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा झाली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले. जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले. २०२२-२३ मध्ये बँकेने खरीप हंगामात ३ लाख ६४ हजार ६९९ शेतकऱ्यांना रक्कम २७१६.५६ कोटीचे अल्पमुदत पीककर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेतील उर्वरित ६४४ शेतकरी सभासदांना आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे जिल्हा बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे, यासाठी आधार प्रमाणीकरण जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जास्त समावेश आहे. वेळेत रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मोठा आधार मिळणार आहे.

- ॲड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com