Farmer Incentive Subsidy : ‘प्रोत्साहनपर’ चा साडेआठ हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण

नियमित कर्जपरत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ४२ हजार ७५५ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
Protsahanapar' Government Scheme
Protsahanapar' Government SchemeAgrowon

परभणी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने (Mahatma Jyotiba Phule Shetkari KarjaMukti Yojna) अंतर्गत नियमित कर्जपरत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) ४२ हजार ७५५ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी विशिष्ट क्रमांक प्राप्त पहिल्या यादीतील ९ हजार ७४१ पैकी ८ हजार ६२५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.

Protsahanapar' Government Scheme
Cashew Crop Insurance : काजूसाठी विमा योजना

प्रोत्साहनपर लाभासाठी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांत घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षांच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. या तीन वर्षांपैकी शेवटच्या वर्षात कर्ज घेतलेले आहे. त्या वर्षाच्या कर्जाची मुद्दल रक्कम विचारात घेतली जाणार आहे. या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील विविध १६ बँकांच्या ४२ हजार ७५५ कर्जखाती यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. विशिष्ट क्रमांकासह ९ हजार ७४१ लाभार्थींची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे.

बँकस्तरावर संबंधित शाखा तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालय, तहसील कार्यालय, गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. गुरुवार (ता. २०) पर्यंत लाभार्थींनी ८ हजार ६२५ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेतले आहे.

त्यात परभणी तालुक्यातील १ हजार १५८ कर्जखाती, जिंतूर ५३२ कर्जखाती, सेलू ४८९, मानवत ९४०, पाथरी १ हजार २८३,सोनपेठ १ हजार २६, गंगाखेड ९०३,पालम ८५६, पूर्णा तालुक्यातील १ हजार ४३८ कर्जखात्यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com