Jalyukta Shiwar Scheme: आजऱ्यात जलयुक्त शिवार मोहीम गतिमान

निवडलेल्या गावात ग्रामस्थांशी संवाद साधून प्रबोधन केले. जलयुक्तची माहिती दिली.
Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar Agrowon

Agriculture Irrigation Scheme : जलयुक्त शिवार मोहिमेसाठी (Jalyukta Shiwar Scheme) शासन व प्रशासन पातळीवर व्यापक पावले उचलली जात आहेत. आजरा तालुक्यातही ही मोहीम गतिमान केली आहे.

जलयुक्त शिवारअंतर्गत (Jalyukt Shiwar 2.0) तालुक्यातील धनगरवाड्यावर पाणी आडवा पाणी जिरवा, यासाठी महसूल विभाग, पंचायत समिती, वनविभाग, उपअभियंता बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, तालुका कृषी विभागाने (Agriculture Department) कंबर कसली आहे.

Jalyukt Shiwar
Jalyukt Shiwar Scheme : ‘जलयुक्त’मध्ये डागडुजी, अपूर्ण कामांवर लक्ष्य

धनगरवाड्यावर क्षेत्रीय भेटी देऊन साईट निश्चित करण्यात येत आहे. ग्रामस्थांकडूनही याला प्रतिसाद मिळत आहे.

आजरा तालुक्यातील हरपवडे, हरपवडे धनगरवाडा, आवंडी धनगरवाडा, किटवडे, किटवडे धनगरवाडा, दाभिल, मोरेवाडी धनगरवाडा, वझरे, वडकशिवाले या गावांत क्षेत्रीय भेटी दिल्या.

Jalyukt Shiwar
Jalyukta Shivar Scheme : जलयुक्त शिवार अभियान २.० प्रभावीपणे राबवा

ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या शेतीसाठी पाणी उपयोगी पडेल, अशा साईट निश्चिती केली आहे.

यामध्ये सीसीटी, समतल चर, शेततळी, वनतळी, नालाबांध, सिमेंट बांध, माती बांध, लुज बोल्डर यासह टॉप टू बॉटमची कामे केली जाणार आहेत.

निवडलेल्या गावात ग्रामस्थांशी संवाद साधून प्रबोधन केले. जलयुक्तची माहिती दिली. प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागातंर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली.

तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहायक गटविकास अधिकारी अविनाश पाटील, आजरा तालुका परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके आदी उपस्थित होते. जलयुक्त शिवारची कामे लवकरच सुरू केली जाणार असल्याचे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com