Farmer Issue : कृषी आयुक्तांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

कृषी विभागातर्फे गुरुवार (ता. १) पासून राज्यात ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ हे अभियान राबविले जात आहेत. या अभियानाअंतर्गत राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर, किन्हीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Dheeraj Kumar
Dheeraj KumarAgrowon

नगर ः कृषी विभागातर्फे (Agriculture Department) गुरुवार (ता. १) पासून राज्यात ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ हे अभियान (Maza Ek Divas Balirajasathi Campaign) राबविले जात आहेत. या अभियानाअंतर्गत राज्याचे कृषी आयुक्त (Agriculture Commisionarate) धीरजकुमार यांनी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर, किन्हीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. बहिरोबावाडीत मुक्काम करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Dheeraj Kumar
Agricultural Marketing Scheme : शेतकरी कंपनीसाठी ‘स्मार्ट' प्रकल्पांतर्गत कृषी पणन योजना

राज्यात ‘एक दिवस शेतकऱ्यांसाठी’ हा उपक्रम राबवला गेला. कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. बहिरोबावाडीत सायंकाळी दाखल झाले. मुक्काम करत दुसऱ्या दिवशी किन्ही येथे ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेतले.

Dheeraj Kumar
Agriculture Startup : व्यावसायिक कल्पनेमध्ये नावीन्यपूर्तता असल्यास स्टार्टअपला फायदा

कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्‍न मांडत पीक नुकसान, पाणंद रस्त्यांसाठी भरीव निधी, यासह शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा मिळावा, वन्य प्राण्यांपासून शेती व पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असून, वन विभागाकडून उपाययोजना कराव्यात आदी मागण्या करण्यात आल्या.

धीरजकुमार म्हणाले, की ‘माझा एक दिवस बळीराजासाठी’ या अभियानांतर्गत राज्याच्या कृषिमंत्र्यांपासून ते गावपातळीवरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जण आजपासून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका गावाची निवड करून तेथे मुक्कामी राहतील. राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारे प्रभावी कृषिविषयक धोरण तयार करून अंमलात आणणार आहे. त्यामुळे मलादेखील आज शेतकऱ्यांमध्ये आल्यानंतर विविध प्रश्‍न समजलेले आहेत. ते सोडविण्यासाठी आम्ही प्रशासन म्हणून सदैव शेतकऱ्यांसोबत राहणार आहोत. या वेळी गावकरी व शेतकरी उपस्थित होते.

बहिरोबाचीवाडी येथे शेतकरी नेते अनिल देठे यांनी दुधाला उसाच्या धरतीवर ‘एफआरपी’ मिळावा, यासाठी कायदा करावा, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, अशा मागण्या केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com